लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दीड महिन्यांपूर्वी वाटूर फाट्याहून पळून गेलेल्या प्रेमी युगलास परतूर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. दरम्यान, मुलीने पालकांकडे जाण्यास नकार दिल्याने तिची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर मुलास अटक करण्यात आली आहे. मंठा तालुक्यातील गूळखंड येथील मुलगी व जिंतूर तालुक्यातील तेली जवळा येथील मुलाची रेल्वे प्रवासात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघे ३० मे रोजी वाटून फाट्याहून पळून गेले. मुलीचा शोध लागत नसल्याने वडिलांनी परतूर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी शनिवारी या दोघास तेलीजवळा येथून ताब्यात घेतले.त्यांना परतूर रविवारी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मुलीच्या आई-वडील, नातेवाईकांनी तिला सोबत घरी येण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र, तिने घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे हतबल झालेल्या आई -वडिलांना ठाण्यातच रडू कोसळले. पोलिसांनी सदर तरुणीची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.
‘ते’ बेपत्ता जोडपे पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: June 19, 2017 12:14 AM