लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पंढरपुरात मोबाईल शॉपी व कापडाचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी अटक केली. चोरी झालेले ५० हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल हॅण्डसेट व तीन साड्या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या.पोलीसांनी सांगितले की, पंढरपुरात संतोष बाबासाहेब थोरवे यांच्या मोबाईल शॉपीतून महिनाभरापूर्वी चोरट्याने विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल, स्पीकर, कव्हर, अॅक्सेसरीज लांबविले होते. पोलीस पथकाच्या स्थळपाहणीत तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात एक चोरटा चोरी करताना कैद झाला होता. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाने काही संशयितांवर पाळत ठेवली होती. यात आरोपी सुरेश शामराव पोपळघट (३५, रा. चापानेर, ता. कन्नड) याने चोरी केल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलिसांना दिली. पोलीस पथकाने सुरेश पोपळघट याचा चापानेर, औरंगाबाद, बुलडाणा, वाळूज एमआयडीसी, पंढरपूर आदी ठिकाणी शोध घेतला होता. मात्र, आरोपी सतत आपला ठावठिकाणा बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.आरोपी सुरेश पोपळघट हा चापानेर येथे आला असल्याची माहिती बातमीदाराने एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली.फौजदार लक्ष्मण उंबरे, पोहेकॉ. वसंत शेळके, रामदास गाडेकर, पोना. प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, सुधाकर केंद्रे, फडे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार सूर्यवंशी, मनमोहन कोलिमी, बंडू गोरेल, बाबासाहेब आंधळे, देवीदास इंदोरे, दीपक मते आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चापानेर येथे छापा मारून संशयित आरोपी सुरेश पोपळघट यास जेरबंद केले.
दुकाने फोडणारा चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:13 AM