लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पेन्शनर महिलेचे ५० हजार रुपये लांबवणा-या रिक्षाचालकास गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून २७,००० रुपये रोख रक्कम व एक आॅटोरिक्षा असा एकूण ८४,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.शफिक खान रफिक खान (२७, रा. मिसारवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यमुनाबाई हिराजी नरवडे (६५,रा. ईटखेडा) या सोमवारी (दि.१६) रोजी रेल्वेस्टेशन जवळील स्टेट बँकेच्या खात्यातून ५० हजार रुपये रोख रक्कम काढून रिक्षात बसून त्या ईटखेडा येथे परत जात असताना अनोळखी रिक्षाचालकाने पेन्शनर बाईकडील रोख रक्कम चोरी केली होती. त्यावरून पोलीस ठाणे सातारा येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.गुन्हेशाखेच्या पथकाने तांत्रिक बाबी तपासून तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने सदर पेन्शनर बाईची रोख रक्कम चोरी करणाºया रिक्षावाल्याचा कसोशीने शोध घेतला. सदरचा गुन्हा हद्दपार आरोपी शफिक रफिक खान याने केलेला असून तो सध्या सातारा परिसरातील कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या मागे सुधाकरनगर रोडवर रिक्षासह आलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कार्यवाही करून शफिक खान रफिक खान यास शिताफीने छापा टाकून जागेवर पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २७,००० रुपये रोख रक्कम एक आॅटोरिक्षा मिळून आली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मागील तीन-चार दिवसांपूर्वी एका म्हाता-या बाईला ईटखेडा येथे सोडण्यासाठी रिक्षा घेऊन गेला असता नकळत तिच्याकडील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे.
ज्येष्ठ महिलेचे ५० हजार रुपये हिसकावणारा रिक्षाचालक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:27 AM