शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

चोरट्यांनी पुन्हा फोडली गारखेड्यात सहा दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:58 PM

गारखेडा परिसरात सलग दुसºया दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शिवाजीनगर रोडवरील सह्याद्री हिल्स येथील सहा दुकाने फोडून २४ तास उलटण्यापूर्वीच चोरट्यांनी विभागीय क्रीडा संकुलासमोरील तीन दुकाने तसेच सूतगिरणी चौकातील अथर्व प्लाझा इमारतीत असलेली तीन दुकाने फोडली. विशेष म्हणजे या सर्व दुकानांत किरकोळ रकमा चोरट्यांनी लांबविल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गारखेडा परिसरात सलग दुसºया दिवशी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शिवाजीनगर रोडवरील सह्याद्री हिल्स येथील सहा दुकाने फोडून २४ तास उलटण्यापूर्वीच चोरट्यांनी विभागीय क्रीडा संकुलासमोरील तीन दुकाने तसेच सूतगिरणी चौकातील अथर्व प्लाझा इमारतीत असलेली तीन दुकाने फोडली. विशेष म्हणजे या सर्व दुकानांत किरकोळ रकमा चोरट्यांनी लांबविल्या. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील सह्याद्री हिल्स येथील दुकाने फोडण्याच्या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच चोरट्यांनी गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलासमोरील निसर्ग अपार्टमेंटमधील अ‍ॅड. डी. एम. पिंगळे यांचे कार्यालय, शिवाजी वैद्य यांचे सॉफ्टटेक प्रोजेक्ट सोल्युशन नावाचे संगणकाचे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आणि विमा सल्लागार दिलीप डोळस यांचे कार्यालयाचे शटर उचकटून चोºया केल्या. एकाच इमारतीमधील तीन शटर चोरट्यांनी उचकटून तेथील गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली. आज गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दुकानमालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरट्यांनी शटर उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने जवाहरनगर पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेत केवळ वैद्य यांच्या दुकानात देवासमोर ठेवलेले सुमारे पाचशे ते सहाशे रुपये चोरट्यांच्या हाती लागले. अन्य दोन्ही दुकानांतून एक रुपयाही चोरीला गेला नाही.अथर्व प्लाझामध्येहीदुकाने फोडलीसूतगिरणी चौक रोडवरील कासलीवाल सुवर्णयोग आणि अथर्व प्लाझा या इमारतीतील तीन दुकानांना बुधवारी रात्री चोरट्यांनी लक्ष्य केले.टेम्पल इम्फोटेक, मुक्ता ब्युटिक आणि अन्य एका दुकानाचे चोरट्याने शटर उचकटले. यापैकी ब्युटिकमधून चोरट्यांनी लॅपटॉप लांबविल्याचे समजले. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.उल्कानगरीत चोरीउल्कानगरी येथील एक गिफ्ट शॉपी फोडून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड लंपास केली. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दुकानमालक गोपाल रामदास पाटील (रा. एन-७, सिडको) यांच्या मालकीची गिफ्ट शॉॅपी उल्कानगरी परिसरातील ज्ञानेश्वरनगरात आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून पाटील घरी गेले. नंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील रोख २५ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी त्यांनी जवाहरनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. अशी माहिती पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.मोबाईल शॉपी फोडून दहा हजारांचा ऐवज लंपासगारखेडा परिसरातील सूतगिरणी चौक ते दुर्गा रोडवरील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे दहा हजारांचे मोबाईल लंपास केले. ही घटना २७ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, दुकानमालक सय्यद अफजल अमीन सय्यद हे २३ डिसेंबर रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले. काम असल्याने त्यांना चार दिवस दुकान उघडता आले नव्हते. त्यांच्या दुकानाला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी दुकानाच्या मागील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्यांचे दहा मोबाईल चोरून नेले. या मोबाईलची एकूण किंमत ९ हजार ९०० रुपये असल्याचे सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरवडे करीत आहेत.