लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे़ मागील दोन दिवसांपूर्वी ढोकी येथील दत्त मंदिरातील मुर्त्यांसह दानपेटी चोरट्यांनी लंपास केली आहे़ तर इटकळ येथे दोन घरे फोडून अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे़ तर २७ मे रोजी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील दोन दुकाने फोडून आतील जवळपास ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बँक कॉलनी भागात राहणारे गिरीष सूर्यकांत आष्टगी यांचे शिवाजी चौकातील राजेनिंबाळकर कॉम्प्लेक्समध्ये साई इंजिनिअरिंग सर्व्हीसेस नावाचे शेतीसाहित्य विक्रीचे दुकान आहे़ शनिवारी रात्रीच्या सुमारास आष्टगी व त्यांच्या दुकानातील कामगार नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले होते़ दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्यांच्या दुकाना शेजारी असलेले शेख कलीम मगबूल हे त्यांचे नॅशनल वॉच व मोबाईल शॉपी दुकान उघडण्यास गेले होते़ त्यावेळी त्यांच्या दुकानाचे पाठीमागील बाजुचा पत्रा काढून आतील साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले़ तर आष्टगी यांच्या यांचे दुकानही फोडल्याचे समजले़आष्टगी यांनी दुकानात जावून पाहणी केली असता दुकानातील १२ हजार रूपये रोख व इतर साहित्य चोरीस गेले़ तर कलीम मगबुल शेख यांच्या दुकानातील घड्याळे, खेळणी, मोबाईल असा जवळपास १५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला़ दोन्ही दुकानातील जवळपास २६ ते ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे़ सदरील प्रकरणी आष्टगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोलिस करीत आहेत.
चोरट्यांनी दोन दुकाने फोडली
By admin | Published: May 29, 2017 12:26 AM