उस्मानाबाद : शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कमेसह संसारोपयोगी साहित्य असा ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस अविनाश सुभाष झोंबाडे हे राहतात़ चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास अविनाश झोंबाडे यांचे घर फोडून आतील गॅस सिलेंडर, सौर ऊर्जेची बॅटरी, कपाटातील रोख सात हजार रूपये असा एकूण ११ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत अविनाश झोंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत़
चोरट्यांनी पळविला ११ हजारांचा मुद्देमाल
By admin | Published: September 25, 2016 11:50 PM