शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

मंगल कार्यालयांतील चोऱ्यांचा पर्दाफाश; म्हातारी निघाली चोरांच्या टोळीची ‘म्होरकी’!

By सुमित डोळे | Published: December 12, 2023 1:32 PM

२० किमी पाठलाग करून गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; म्हातारीसह सुनेचा भाऊ, पुतण्या आणि नातवाला अटक तर मुलगा फरार

छत्रपती संभाजीनगर : पुतण्या, मुलगा व आठ वर्षांच्या नातवंडासह मध्य प्रदेशातील ६३ वर्षीय रामबाई हरगोविंदसिंग सिसोदिया ही मंगल कार्यालयात चोऱ्या करणाऱ्या टोळीचे नेतृत्व करत होती. ३ डिसेंबर रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल व औरंगाबाद जिमखान्यात चोरी करून सोलापूर, लातूरमध्ये प्रयत्न केला. पुन्हा शहरात येऊन बीडला जात असताना पाचोड परिसरात गुन्हे शाखेने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. रामबाईसोबत सुनेचा भाऊ सोनू रम्मो सिसोदिया (२५), पुतण्या आशिष बलराम सिसोदिया (३४) व नातवाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगा गौतम मात्र पोलिसांसोबतच्या झटापटीत निसटला.

३ डिसेंबर रोजी जिमखाना क्लबमध्ये सुनील जैस्वाल यांच्या पत्नीची ५ लाख २५ हजारांच्या दागिन्यांची बॅग चोरीला गेली. दोन तासांनी हॉटेल रामा इंटरनॅशनलमधून दीपक कदमबांडे यांच्या भाच्याच्या लग्नातून साडेतीन लाख रुपये असलेले बॅग चोरीस गेली. ९ डिसेंबरपर्यंत शहरात लग्न समारंभातून चोरीच्या ६ घटना घडल्या होत्या. याप्रकरणी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक संदीप सोळंके यांना ही टोळी रविवारी शहरातून बीडकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. अंमलदार नवनाथ खांडेकर, सुनील बेलकर, नितीन देशमुख, मनोहर गिते, श्याम आढे यांनी पाठलाग सुरू केला.

२२ किमी पाठलागरामबाई व तिचे कुटुंब चोरीसाठी ३० नोव्हेंबर रोजी आय-२० कार घेऊन निघाले हाेते. शहरानंतर त्यांनी सोलापूर, लातुरात चोरीचा प्रयत्न करून ते पुन्हा शहरात आले. रविवारी बीडच्या दिशेने निघाले. सोळंके यांचे पथक पाठलाग करत होते. दाभरूळ फाट्याजवळ चहा, नाश्त्यासाठी थांबताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची चांगलीच झटापट झाली. यात ८ वर्षाच्या मुलासह तिघे हाती लागले. पण, गौतम पळाला. कारमध्ये लग्नात जाण्यासाठीचे कपडे, स्वयंपाकाचे साहित्य होते.

ऐवज गेला लाखोंचा, सापडला हजारोंचाचदोन्ही लग्नातून मोठा ऐवज गेला. मात्र, टोळीकडे केवळ रामा इंटरनॅशनलचे ५० हजार, तर जिमखान्यातून गेलेले अवघ्या ५ हजारांचे दागिने आढळले. त्याआधी अयोध्या मैदानावर स्वयंपाक केला. त्यानंतर शहरात फिरून लॉन, कार्यालयांची रेकी केली. संशय येईल अशा ठिकाणी ते मुक्काम टाळत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद