औरंगाबाद : तृतीयपंथीयाची छेड काढल्यानंतर शहरातील अनेक तृतीयपंथीय तिथे जमा होऊन त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धुडगूस घातला. फर्निचरची तोडफोड करीत कागदपत्रे भिरकावल्याचा प्रकार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री घडला. याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तृतीयपंथीयांचे तांडव पाहून पोलीसही चक्रावून गेले. या तृतीयपंथीयांना आवरणे कठीण असल्याचे पाहून पोलिसांनी ठाण्यामधून पळ काढला. पहाटे अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. तोपर्यंत उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये होळी आणि दिवाळी एकत्रच साजरी झाली होती. धुडगूस घालणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बंडेवाड तपास करीत आहेत.
कोणी काढली छेडउस्मानपुरा पोलीस ठाण्यात एका रिक्षा चालकाला पकडून आणले होते. त्याच्या भेटीसाठी आलेल्या तृतियपंथीयाची पोलीस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या खबºयाने छेड काढली. गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर २० ते २५ तृतीयपंथीयांनी गोंधळ घातला.
ऐन दिवाळीच्या रात्री गोंधळतृतीयपंथीयांची संख्या पाहून हिस्ट्रिशिटर खबºया पळून गेला. ठाण्यातील सफाई कर्मचारी हा पोलीसच असल्याचा संशय येऊन तृतीयपंथीयांनी त्याला हजर करण्यासह गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर संतप्त तृतीयपंथीयांनी पोलीस ठाण्यात धुडगूस घालण्यास सुरुवात केली. टेबल व इतर फर्निचरची तोडफोड केली. मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा धिंगाणा पहाटेपर्यंत सुरू होता. पहाटे अतिरिक्त पोलीस कुमक आल्यानंतर तृतीयपंथीयांचा धिंगाणा बंद झाला.