लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: लालवाडी भागातील तृतीय पंथियांनी घरकुलाच्या मागणीसाठी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते़ त्यानंतर मनपाने लाभार्थ्यांची यादी मागविली होती़ त्यानुसार तृतीय पंथियांनी घरकुलासाठी अर्ज दाखल केले आहेत़ तृतीय पंथियांच्या घरकुलासाठी कमल फाऊंडेशनच्या वतीने पुढाकार घेतला होता़ मनपानेही जाहिरातीद्वारे तृतीय पंथियांकडून घरकुलासाठी अर्ज मागविले होते़ शुक्रवारी २३ तृतीय पंथियांचे अर्ज आयुक्तांकडे सादर केले़ त्यात शानूर बाबू बकश, रश्मीता शानूर बकश, शीला अर्चना बकश, वर्षा शानूर बकश, बाली वर्षा बकश, संध्या वर्षा बकश, मोनिका वर्षा बकश, जया शानूर बकश, दीपा जया बकश, मुस्कान जया बकश, सनम जया बकश, गौरी शानूर बकश, अंजली गौरी बकश, कल्याणी गौरी बकश, दिव्या गौरी बकश, अर्चना शानूर बकश, नानू शानूर बकश, राणी वर्षा बकश, चाहत गौरी बकश, मनीषा बकश यांचा समावेश आहे़
तृतीयपंथियांचे घरकुलासाठी अर्ज
By admin | Published: July 15, 2017 12:19 AM