व्यंकटेश वैष्णव ,बीडविधानसभा निवडणुकीत बीड सोडता इतर पाच विधानसभा मतदार संघात भाजपने बाजी मारली़ पाच पैकी तीन नविन उमेदवारांना आमदारकीची संधी मिळाली आहे़ एकूनच तिघांच्या गळ्यात जनतेने पहिल्यांदाच आमदारकीची माळ घातली आहे़बीड विधानसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघापैकी बीड विधानसभा मतदार संघातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून विजय मिळविता आला़ इतर गेवराई, केज व माजलगाव, परळी,आष्टी मतदार संघात भाजपाने विजय मिळविला़ यामध्ये परळीच्या विजयी उमेदवार पंकजा मुंडे व आष्टीचे भीमराव धोंडे सोडता केजच्या संगिता ठोंबरे, गेवराईचे अॅड़ लक्ष्मण पवार व माजलगावचे आऱ टी़ देशमुख हे पहिल्यांदाच आमदार झाले आहे़ ही संधी त्यांना यावेळी जनतेने दिली आहे़ राज्यात कुठल्याच पक्षाला बहुमत नसले तरी भाजप-शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात असे संकेत आहेत़ बीड जिल्हयात तीन भाजपचे उमेदवार पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत़ तर परळीच्या आ़ पंकजा मुंडे व आष्टीचे आ़ भिमराव धोंडे हे अनुभवी आहेत़ पंकजा मुंडे यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे तर धोंडे हे यापुर्वी पंधरा वर्ष आमदार राहिलेले आहे़ आत मंत्रीमंडळात बीड पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना संधी दिली जाते की, अनुभवी असलेले पंकजा मुंडे व धोंडे यांना संधी मिळते़ हे पहाणे औचुक्याचे ठरणार आहे़ गेवराईचे भाजप चे आ़ अॅड़ लक्ष्मण पवार हे पहिल्यांदाच आमदार झालेले असले तरी पवार यांचे मताधिक्य पंकजा मुंडे यांच्या दुप्पट म्हणजेच ६० हजार १ मताने विजयी झालेले आहेत़ पवार यांचे मताधिक्य इतर उमेदवारांच्या तुलनेत महत्वाचे आहे़ त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळते का ते पहावे लागणार आहे़केजच्या भाजप उमेदवार अनुसुचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत़ याशिवाय राकॉचे माजी आ़ पृथ्वीराज साठे सोडता १९९९ पासून केजच्या आमदाराकडे कायम मंत्रीपद राहिलेले आहे़ यावेळी केजमध्ये भाजपचा उमेदवार आहे़ विशेष म्हणजे राज्यात देखील भाजप-युतीचे सरकार स्थापन होऊ शकते़ यामुळे केजच्या भाजप आ़ संगिता ठोंबरे पहिल्यांदाच आमदार झालेल्या असल्या तरी त्यांना मंत्री मंडळात स्थान मिळू शकते़ तसेच मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असलेल्या पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली तरी त्यांच्यावर कॅबिनेट मधील एखाद्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी येऊ शकते़
ठोंबरे, पवार, देशमुख यांना आमदारकीची लागली ‘लॉटरी’
By admin | Published: October 20, 2014 12:06 AM