लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शौचालय न बांधताच सहा हजार रूपयांचा पहिला हप्ता हडपणाºया ४७ जणांविरोधात शहर व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पालिकेने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते. पत्र देऊन महिना उलटला तरी अद्यापही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. नगर पालिका पत्र देऊन मोकळी झाली आहे तर पोलीस म्हणतात, आम्हाला न्यायालयाचे आदेश दाखवा. या दोघांच्या टोलवाटोलवीत अनुदान लाटणाºयांना अभय मिळत आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयांसाठी १७ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. त्यानुसार पालिकेच्यावतीने काही लाभार्थ्यांना अनुदान वाटपही करण्यात आलेले आहे. परंतु काही लोकांनी पहिला सहा हजार रूपये पहिला हप्ता घेत नगर पालिकेची फसवणूक करीत शौचालयच बांधले नाहीत. हा प्रकार स्वच्छता निरीक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला होता. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकांनी अशा लोकांची यादी करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मुख्याधिकारी यांच्याकडे परवाणगी मागितली. त्याप्रमाणे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी अनुदान लाटणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र शहर व शिवाजीनगर पोलिसांना दिले होते. परंतु तब्बल महिना उलटूनही यावर कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे संशय व्यक्त होत आहे.ठाण्याला दिलेल्या पत्रात सदरील लोकांनी शासनाची फसवणूक केली, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. नियमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. आता याबाबत मुख्याधिकारी यांच्या परवानगीने पोलीस अधीक्षक यांना भेटून गुन्हे दाखल करणार आहोत, असे नगर पालिकेतील स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके यांनी सांगितले.
‘त्या’ ४७ जणांना अभय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:50 AM