लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘पर्यटनाच्या राजधानीचे आरोग्य धोक्यात’ हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने रविवारी शहरातील उघड्यावर खाद्यपदार्थ व मांस विक्री करणा-या विक्रेत्यांची तपासणी केली. माशांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्नपदार्थ झाकून ठेवण्याचे आदेश दिले. आदेशाचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली.शहरात सर्वत्र माशांनी थैमान घातले आहे. घाटी रुग्णालयात दररोज गॅस्ट्रोचे ५ ते ६ नवीन रुग्ण दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी लोकमतने बातमी प्रसिद्ध केली होती. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चं.भा.पवार यांनी आज गंभीर दखल घेतली. अन्न सुरक्षा अधिकाºयांची तातडीची बैठक बोलावून उघड्यावर अन्न विक्री करणाºयांवर कारवाईचे आदेश दिले. रविवारी सरकारी कार्यालयांना सुटी असतानाही सहायक आयुक्त मि.दा. शाह यांच्या नेतृत्वाखाली जुना मोंढ्यातील रविवारच्या आठवडी बाजारासह हमालवाडी आदी भागातील उघड्यावरील ३२ फरसाण, मसाला व खाद्यपदार्थ विक्रेते व ३८ मांसाहार विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. पावसाळी वातावरणात अन्नपदार्थ दूषित होण्याची शक्यता असल्याने तसेच माशांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शाकाहारी व मांसाहारी पदार्थ झाकून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व विक्रेत्यांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर घेण्यात आले. यापुढे कोणी उघड्यावर पदार्थ विक्री करताना दिसून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, निखिल कुलकर्णी, संजय चट्टे, अनिकेत भिसे, ऋषिकेश मरेवार यांचा पथकात समावेश होता.दररोज होणाºया तपासण्याशहरात उघड्यावर अन्नपदार्थ विक्री करणाºयांची दररोज तपासणी करण्यात येणार आहे. कोणी व्यवस्थित अन्नपदार्थ झाकून ठेवले नसेल, स्वच्छतेची काळजी घेतली जात नसेल, तर त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मि.दा. शाह यांनी दिली.
औरंगाबादेत अन्नपदार्थ उघड्यावर विकणाऱ्यांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:21 AM
‘पर्यटनाच्या राजधानीचे आरोग्य धोक्यात’ हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने रविवारी शहरातील उघड्यावर खाद्यपदार्थ व मांस विक्री करणा-या विक्रेत्यांची तपासणी केली.
ठळक मुद्देमाशांचा प्रादुर्भाव : अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी