लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्वातील १८७ शाळेत १ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यात आले असले तरी पाचव्या फेरी अखेर १ हजार ३ जागा अद्यापही रिक्तच आहेत़ त्यामुळे २४ आॅगस्ट रोजी सहावी फेरी काढण्यात आली आहे़बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येत आहे़ यासाठी पहिली फेरी ७ मार्च रोजी पार पडली़ एकुण २ हजार ६०१ जागेसाठी १ हजार ९६९ विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली़ त्यापैकी १ हजार १४७ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत प्रवेश घेतला तर ३९४ विद्यार्थ्यांना विविध कारणाहून अपात्र ठरविण्यात आले़ तर ४२८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्कच केला नाही़ दुसरी निवड यादी २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आली़ एकुण १ हजार ४५४ जागेपैकी २३२ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला़ तर ३८ विद्यार्थी प्रवेशासाठी अपात्र ठरले़ तिसरी फेरी १९ एप्रिल रोजी पार पडली़ १ हजार २२२ जागेपैकी १३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले़ चौथी फेरी ८ मे रोजी जाहीर झाली़ यामध्ये १ हजार ८४ पैकी ९२ विद्यार्थ्यांची निवड केली़ तर ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ पाचव्या फेरी अखेर १ हजार ३ जागा रिक्त होत्या़ त्यानंतर आता सहावी फेरी घोषीत करण्यात आली आहे़ ही निवड यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे़ निवड झालेल्या व न झालेल्या पाल्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे़ परंतु ज्यांना एसएमएस आले नाहीत, अशांनी संकेत स्थळावरून अॅडमिट कार्डची प्रिंट काढून घ्यावी व प्रवेशासाठी निवड झालेल्या शाळेत उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी़ निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत प्रवेश घेण्याचा कालावधी २८ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी दिली़
‘आरटीई’च्या हजार जागा रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:30 AM