शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

बी.कॉम.च्या एका विषयात हजारो विद्यार्थ्यांना मिळाले शून्य गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 5:17 PM

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad बी.कॉम.च्या पहिल्या सत्राचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विषयाचा पेपरमध्ये तांत्रिक गोंधळ

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण

औरंगाबाद : विद्यापीठाने सोमवारी जाहीर केलेल्या बी.कॉम.पहिल्या सत्राच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात बहुतांशी विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. दरम्यान, परीक्षेतील तांत्रिक अडचणीचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला असावा, असा कयास पालकांनी काढला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.

दुसऱ्या दिवशी अनेक स्थानिक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटनांनी परीक्षा विभागाकडे धाव घेऊन यासंदर्भात विचारणा केली; मात्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी बी.कॉम. अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या काॅम्प्युटर ॲप्लिकेशन विषयाच्या परीक्षेत दिलेला पेपर आणि त्याची ‘अन्सर की’ हे बरोबर असल्याचे सांगत विद्यार्थीच पेपर सोडविण्यात कमी पडले असावेत, असा निष्कर्ष काढला.

विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमाच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. केवळ या एकाच विषयात त्यांना शून्य गुण मिळाल्यामुळे संभ्रमात पडले आहेत. या विषयाचा संपूर्ण पेपर सोडविल्यानंतर काही तरी गुण मिळायला हवे होते. शून्य गुण मिळूच शकत नाहीत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक बिघाड झालेला असावा, त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले असावे, असे पालकांचे म्हणणे आहे.

मंगळवारी विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) मोहित जाधव, पंकज सपकाळ, मित्रवर्धन काळे, उदयसेन काळे, शार्दूल उबाळे, अथर्व शेटे, धर्मराज देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांची भेट घेतली व या विषयाच्या पेपरची पुनर्तपासणी करुन सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी केली.

निवेदन सादरबी.कॉम. पहिल्या सत्राच्या काॅम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाच्या पेपरची पुनर्तपासणी करुन सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, या मागणीचे निवेदन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांना विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) मोहित जाधव, पंकज सपकाळ, मित्रवर्धन काळे, उदयसेन काळे आदी पदाधिकाऱ्यांनी सादर केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी