जिल्हा परिषद : २०१८-१९ आर्थिक वर्षातील पावत्या देण्याची मागणीऔरंगाबाद : जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत असलेल्या आठ हजार शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशेब मिळत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. या हिशेबाच्या पावत्या तात्काळ मिळाव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे जि.प.च्या वित्त विभागाकडे केली आहे.जि.प. शिक्षकांच्या वेतनातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येते. त्याचा हिशेब म्हणून भविष्य निर्वाह निधीची पावती शिक्षकांना प्रत्येक वर्षी जुलै महिन्यातच देण्यात येते. मार्च २०१६-१७ पर्यंत सर्व शिक्षकांचा हिशेब पावत्यांच्या स्वरूपात मिळालेला आहे. मात्र, मार्च २०१७-१८ या आर्थिक वर्षातील पावत्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील आॅक्टोबर महिना मध्यात आला तरीही देण्यात आलेल्या नाहीत. मार्च २०१८ संपून सात महिने झाले आहेत; परंतु अद्यापही वित्त विभाग औरंगाबाद मार्फत शिक्षकांना हिशेब मिळाला नाही. पीएफमधील निधी हा महत्त्वाच्या कारणांसाठी काढता येतो. मात्र,अनेक शिक्षकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. वित्त विभागाने त्वरित सर्व तालुक्यातील शिक्षकांना मार्च २०१७-१८ चा हिशेब पूर्ण करून हिशेब पावती (स्लीप) वितरित कराव्यात व शिक्षकांची आर्थिक अडचण दूर करावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे संतोष ताठे, प्रकाश दाणे, रमेश जाधव, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, सुनील चिपाटे, संजय बुचडे, मच्छिंद्र भराडे, मच्छिंद्र शिंदे, दत्ता गायकवाड, अन्वर शेख, श्रीराम काथार, गोविंद उगले, प्रवीण संसारे, सतीश पाटील, विनोद पवार, गणेश धनवाई, बाबासाहेब जगताप, नितीन पाटील, सुषमा खरे, ऊर्मिला राजपूत, रोहिणी विद्यासागर, सुप्रिया सोसे आदींनी केली आहे.
हजारो शिक्षकाच्या ‘पीएफ’चा हिशेब मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 9:52 PM
जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत असलेल्या आठ हजार शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशेब मिळत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
ठळक मुद्देteachers pf