उस्मानाबाद : कामाच्या तक्रारी का करतोस म्हणून कटकारस्थान रचून गैरकायद्याची मंडळी जमा करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून जि.प.सदस्य प्रशांत चेडे यांच्यासह ११ जणांविरूध्द वाशी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी येथील मुरलीधर सदाशिव तागडे हे आॅगस्ट रोजी जनावराच्या दवाखान्याजवळ असताना जि.प.सदस्य प्रशांत चेडे व नितीन चेडे यांनी कटकारस्थान रचून मला व माझ्या मुलास कोयत्याने व काठीने मारहाण केल्याची तक्रार उस्मानाबाद येथे उपचारादरम्याने पोलीसाकडे केली आहे. उस्मानाबाद पोलीसांनी सदरील प्रकरण हे वाशी पोलिसाच्या हद्दीत असल्याकारणाने वाशी पोलिसाकडे वर्ग केले आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये चंद्रकांत मधुकर चेडे, दिंगांबर गोपाळ कवडे, समाधान भारत चेडे, प्रकाश विनायक शेटे, अशोक प्रभुलिंग भाळवणे, बाबू विठ्ठल चेडे, बंडू पवार, मधुकर चंद्रकांत चेडे (सर्व रा.वाशी) व आश्रुबा विठ्ठल माने (रा. पिंंपळगाव लिंगी) यांचा समावेश असल्याचे उस्मानाबाद येथे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रशांत चेडे व नितीन चेडे या दोघानी कटकारस्थान रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वाशी पोलिसांत ७ आॅगस्ट रोजी सायंकाळी याची नोंद झाली आहे. सदरील घटनेचा अधिक तपास तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौहान हे करत आहेत. (प्रतिनिधी)
जिवे मारण्याची धमकी
By admin | Published: August 09, 2015 12:23 AM