औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जलील यांना धमकवण्यात आलं आहे. यावर आज इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला अशा खूप धमक्या येतात, पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही, तसेच त्याला महत्व देखील देत नसल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं आहे. या क्लिपमध्ये मला जी भाषा वापरण्यात आली आहे. त्यावर वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईल, असंही जलील यांनी सांगितलं आहे.
इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. यात एक राणे समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकडे महाराष्ट्रातील गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर गेल्यामुळे फोनवरुन धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ असं खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा, मनसे यांच्यासह इतरांनी ओवैसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आता जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. मात्र याकडे गृहविभाग लक्ष देत नसल्याचं जलील यांचं म्हणणं आहे. त्याचवेळी औरंगाबाद सभेनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत भावाविरोधात कठोर कलमं न लावल्याचा आरोप देखील केला होता.