शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

देशाच्या सुरक्षेला धोका; अमेरिका, सौदीमधून आलेले ५३ हजार आंतरराष्ट्रीय कॉल दाखवले स्थानिक

By सुमित डोळे | Published: June 10, 2023 12:22 PM

मुंबईच्या नेटवर्क कंपनीचा धक्कादायक घोटाळा; सायबर पोलिसांकडून छापा, व्यवस्थापक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क प्रा. लि. या कंपनीने सेटअप तयार करून आयएलडी परवानाधारक गेट वे बायपास करुन हजारो आंतरराष्ट्रीय कॉल्स बेकायदेशीरपणे स्थानिक कॉल म्हणून वळवले. ज्यामुळे विदेशातून येणारे आयएसडी कॉल्स हे स्थानिक कॉल्स म्हणून नोंदवले गेले. परिणामी, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला गेलाच; परंतु देशाची सुरक्षाच भेदून त्याने हा प्रकार केल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दूरसंचार सेवा देणाऱ्या टाटा कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जालना रस्त्यावरील कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून व्यवस्थापक सन्नी देवेंद्र (रा.छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली.

इंटरनेट व इतर नेटवर्क सुविधा पुरवणाऱ्या या कंपनीने जालना रस्त्यावरील सागर ट्रेड सेंटरच्या एका गाळ्यात कार्यालय थाटले होते. सदर कंपनीच्या विनंतीवरून टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने त्यांना एसआयपी ट्रंक सर्व्हिस देण्यासाठी अटी शर्ती पूर्ण करून करार केला. त्या अंतर्गत कंपनीने सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्याने एसआयपी ट्रंक वापरण्यास सुरुवात केली. मे महिन्यात मात्र टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीला स्टार डिजिटल नेटवर्क कंपनी बेकायदेशीर पद्धतीने ॲप, सॉफ्टवेअरमध्ये बदल करून आयएसडी कॉल्स एसटीडी म्हणून मार्गस्थ करत आहे. याची पडताळणी केली असता दोन महिन्यांत असे अनेक कॉल्स स्टार डिजिटल नेटवर्क कंपनीने वळवले असल्याचे समजले. त्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचे नोडल अधिकारी धनंजय यादव यांनी कंपनीच्या आदेशावरून शहर पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, सायबरच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तपास सुरू केला. गुरुवारी त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक राहुल चव्हाण, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अभिलाष चौधरी यांनी छापा टाकला. तेव्हा सन्नी देवेंद्रला ताब्यात घेत झडती घेत आंतरराष्ट्रीय कॉल्स बायपास करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

नेमकी काय आहे गेटवे बायपास प्रक्रिया?टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनी डीओटी कार्यालयाचा परवाना घेऊन दूरसंचार सेवा पुरविते. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय कॉल्सची (आयएलडी) सेवा मिळण्यासाठी त्यांनी विदेश संचार निगम लि. कंपनीसोबत करार आहे. विदेशातून भारतात येणारे व भारतातून बाहेर जाणारे कॉल केवळ आयएलडी परवानाधारकांनाच अधिकृत आहेत. या कॉलचे आदानप्रदान आंतरराष्ट्रीय गेटवेद्वारे करणेच आवश्यक असते. खासगी कंपनी कॉल इतरत्र वळवू शकत नाही.

मग सेव्हन स्टार कंपनीने काय केले ?या कंपनीला टाटाकडून एक हजार कनेक्शन मिळाले होते. त्यातही ते केवळ नेटवर्कसाठी व मुंबईपुरतेच मर्यादित होते. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने सेटअप करून आयएलडी परवानाधारक गेटवे बायपास केली. त्या आधारे आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक कॉल्स म्हणून रूपांतरित झाले. कॉल विदेशातून येत होते. मात्र, त्याची नोंद स्थानिक म्हणून होत गेली. हे कॉल्स कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येत नाही. म्हणून हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका समजला जातो. शिवाय, आंतरराष्ट्रीय कॉल्सचा दर, परवान्याची किंमत कोटीत असल्याने शासनाचा महसूलदेखील बुडाला.

सर्वाधिक कॉल्स या देशातूनपोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांत या कंपनीने गेटवे बायपास करून तब्बल ५३ हजार ७०३ कॉल वळविले. यातील बहुतांश अमेरिका, सौदी, बहरीन, ऑस्ट्रेलिया देशांतून आले आहेत. या बेकायदेशीर कॉल्सची ओळख पटविता येत नसल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे पोलिस, टाटाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती