लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील शेतकºयांकडे २ कोटी ७० लाख रूपये वीजबिल थकित असून ते न भरल्यामुळे ५ हजार ५०० वीजजोडण्या तोडल्या आहेत. परिणामी उभे पीक जाळून नष्ट करण्याचा गोरखधंदा मांडल्याने दुष्काळात तेराव्या महिन्याचा प्रत्यय बळीराजास येत आहे़आदिवासी, डोंगराळ, नक्षल, बंजारा, आदिवासीप्रवण बहुतांश क्षेत्र पेसा अंतर्गत असलेल्या तालुक्यातील शेतकºयांकडे असलेले २ कोटी ८० लाख थकबाकी आहे़ त्यामुळे साडेपाच हजार जोडण्या तोडण्यात आल्या आहेत़ यासंदर्भात माहूरचे सहायक अभियंता जे़ एस़ मेश्राम यांनी, १०० टक्के आदेशाचा मी ताबेदार असल्याने या वीजजोडण्या तोडल्या आहेत़ मी सुद्धा शेतकºयांचा मुलगा असल्याने व्यथित झालो असल्याचे म्हटले आहे़ माहूर परिसरातील बहुतांश अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त व बहुजन शेतकºयांच्या मनात तीव्र असंतोष आहे़दिवाळीनंतर शेतमालाचे भाव पडल्याने सरकारने शेतकºयांना कर्जमाफी न देता थकित वीज देयकापैकी चालू देयके भरण्याची सक्ती केली आहे़ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याहीवर्षी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ घोषित करून त्यानुसार शेतकºयांना चालू देयके भरून त्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावयाचा व थकित रक्कमेवर हप्ते पाडून त्यावरील व्याज व दंड माफ करण्याची घोषणा केली आहे.अवकाळी पावसामुळे कापूस केवळ २ हजार रुपये प्रतिक्विंटल तर काळे पडलेले सोयाबीन हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे़तालुक्यातील शेतकरी शोषित व गोरगरीब असल्यामुळे तसेच या परिसरातील जमिनी भरकाड व चिभाड असल्याने ते दशकानुदशके अर्धपोटी जीवन जगत आहेत़ या परिस्थितीत पोटाला भाकरच नाही, विद्युत बिल कसे भरणार? हा प्रश्न आहे़ सध्या हरभरा जमिनीतच असून शेतकºयांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे़ हा प्रकार निंदनीय असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते जयकुमार अडकिणे व शेतकरी नेते अविनाश टनमने यांनी व्यक्त केले आहे.
वीजतोडणीमुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:17 AM