शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

हज कमिटीचे चेअरमनपद मिळवून देण्याच्या आमिषाने तीन जणांनी केली बांधकाम व्यावसायिकाची ३३ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:35 AM

औरंगाबाद : हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवून मुंबई-दिल्लीतील तीन जणांनी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिकाचे तब्बल ३३ ...

औरंगाबाद : हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवून मुंबई-दिल्लीतील तीन जणांनी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिकाचे तब्बल ३३ लाख रुपये उकळल्याचे समोर आले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत आहेत.खालेद राहगीब (रा. नवी दिल्ली), परवेज आलम (रा. शाहीन बाग, ओकला, नवी दिल्ली) आणि आबुसाद (रा.मुंबई), अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, जयसिंगपुरा येथील रहिवासी बांधकाम व्यावसायिक मोहंमद आरेफोद्दीन नूरद्दीन सिद्दीकी (४३) यांना त्यांच्या व्यवसायाची दूरदर्शनवर जाहिरात करायची होती. त्यानिमित्त २०१५ मध्ये आरेफोद्दीन हे त्यांचे मित्र हाफीज खालेद आणि मौलाना सादिक (ह.मु. औरंगाबाद, मूळ रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्यासोबत मुंबईला गेले होते. तेव्हा सादिक यांनी त्यांना सांगितले की, दिल्ली दूरदर्शनमध्ये खालेद राहगीब हे कार्यरत असून, ते तुम्हाला जाहिरातीसाठी मदत करतील, तसेच सादिक यांनी खालेद यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून आरेफोद्दीनसोबत बोलणे करून दिले. त्यानंतर ते औरंगाबादेत परतले. काही दिवसांनंतर आरेफोद्दीन आणि परवेज यांच्यात मोबाईलवर बोलणे झाले.२७ जानेवारी २०१५ रोजी दिल्लीहून आरोपी खालेद राहगीब आणि परवेज आलम हे औरंगाबादेत आले. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची हॉटेलमधील व्यवस्थाही मोहंमद आरेफोद्दीन यांनीच केली. त्यांच्यात जाहिरातीसंदर्भात चर्चाही झाली. जाहिरात देण्यासाठी मुंबईला जावे लागेल, असे खालेद आणि परवेज म्हणाले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी खालेद, परवेज आणि मौलाना सादिक हे आरेफोद्दीन यांना सोबत घेऊन मुंबईला गेले. दुसऱ्या दिवशी तेथील हॉटेलमध्ये गप्पा मारत असताना खालेद म्हणाला की, परवेज यांची महाराष्ट्र सरकारमधील अधिकाºयांशी घनिष्ट ओळख आहे. ते तुम्हाला हज कमिटीच्या चेअरमनपदी सहज नियुक्ती करून देऊ शकतात. परवेज, खालेद यांनी आरेफोद्दीन यांची मुंबईतील मोठ्या लोकांसोबत ओळख करून त्यांचा विश्वास संपादन केला होता.या दोघांच्या गळाला लागलेल्या आरेफोद्दीन यांनी हज कमिटीचे चेअरमन होण्याची तयारी दर्शविली. हे पाहून परवेजने या नियुक्तीसाठी ३३ लाख रुपये भरण्याची तयारी ठेवा, असे सांगितले. त्यालाही आरेफोद्दीन तयार झाले; मात्र पैसे घेण्यासाठी औरंगाबादला यावे लागेल, अशी अट आरेफोद्दीन यांनी घातली. त्यास होकार देऊन परवेज दिल्लीला गेला आणि आरेफोद्दीन मित्रासह औरंगाबादला परतले.काही दिवसांनी परवेजने आरेफोद्दीनशी संपर्क साधून तुमचे नियुक्ती पत्र तयार होत आहे; परंतु पैसे अगोदर द्यावे लागतील, असे सांगितले. त्या आमिषाला बळी पडत आरेफोद्दीन यांनी परवेजला २३ लाख रुपये रोख दिले. उर्वरित दहा लाख रुपये नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर परवेजने पुन्हा आरेफोद्दीन यांच्याशी संपर्क साधून पैसे पाठविण्याचे सांगितले. त्यानुसार आरेफोद्दीन यांनी त्यांचा मुलगा अब्दुल कदीरमार्फत नवी दिल्ली येथे खालेदला दहा लाख रुपये पाठवून दिले.पैैसे उकळताच तोडला संबंधआरेफोद्दीन यांच्याशी सतत फोनवर संपर्क साधणाºया परवेज, खालेद आणि आबुसाद यांनी ३३ लाख रुपये उकळल्यानंतर हज कमिटी चेअरमनपदी नियुक्तीपत्र तर दिलेच नाही; पण त्यांच्याशी संबंधही तोडला. यामुळे पैसे परत करा, अशी मागणी आरेफोद्दीन यांनी त्यांच्याकडे केली. एवढेच नव्हे तर आरेफोद्दीन आणि त्यांच्या मित्रांनी वेळोवेळी मुंबई आणि दिल्ली येथे परवेज, खालेद अणि आबुसाद यांची भेट घेऊन आणि मेसेज पाठवून पैसे परत करण्याची विनंती केली; मात्र त्यांनी पैसे परत केले नाहीत. शेवटी आरेफोद्दीन यांनी त्यांच्याविरोधात विश्वासघात करून ३३ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी चौकशी करून याप्रकरणी गुन्हा नोंदविला. पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी