शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

तीन दिवस उलटले;  ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:15 IST

निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे टाकण्यात आलेल्या ९०० मिमी जलवाहिनीचे पाईप सोमवारी दुपारी फारोळा येथे निखळले. तीन दिवस उलटल्यानंतरही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात मजिप्राला यश आले नाही. निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सहा ते आठ महिन्यांपूर्वीच २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीच प्रकाशित केले. त्यानुसार जलवाहिनीचे पाईप जागोजागी निखळत आहेत. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून सध्या १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. पूर्ण क्षमतेने ७५ एमएलडी उपसा सुरू झाल्यावर जलवाहिनीचे आणखी बिंग फुटणार आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता फारोळा येथे जलवाहिनीचे पाच पाईप निखळले. मंगळवारी ते दुरुस्त करून चाचणी घेतली. त्यानंतर पुन्हा मोठी गळती निदर्शनास आली. बुधवारी दिवसभर मजिप्राकडून काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत त्यांना यश आले नव्हते.

गेवराई येथेही गळतीपैठण रोडवरील गेवराई गाव येथेही ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठे लिकेज आहे. ही गळती बंद करण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी जलवाहिनी सुरू असताना आजूबाजूला सिमेंट काँक्रीट टाकले. त्यानंतरही गळती थांबली नाही. तीन दिवसांचे शटडाऊन असतानाही येथील लिकेजचे काम करण्यात आले नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी