शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नांदुरघाटमध्ये रात्रीतून तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:48 AM

नांदुरघाटमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरफोड्या केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरघाट : केज तालुक्यातील नांदुरघाटमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरफोड्या केल्या. यामध्ये २ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान, घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.सखाराम ज्ञानोबा जाधव यांच्यां घरातील रोख रक्कम व नव्या मोबाईलसह ३० हजार रुपये, अंबर शामराव जाधव यांची १५ हजार रुपये दुचाकी व महादेव राजेंद्र दोडके यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, असा मिळून १,९१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरटे घेऊन पसार झाले. दोडके यांचे सर्व कपडे, डाळी, पीठ, कुरवड्या, पापड्या, महिलांची कपडे चोरट्यांनी फेकून दिले.नंतर चोरटे सखाराम जाधव यांचे गेट तोडून आत प्रवेश केल्यावर कपाट उघडत असताना त्याच्या आवाजाने घरातील लोकांना जाग आली. त्यातील एका चोराला पकडले देखील; परंतु इतर चार ते पाच जणांनी हत्यार घेऊन घरात प्रवेश केल्यावर त्याला सोडून दिले. प्रसंगावधान ओळखून जाधव यांनी पाठलाग केला नाही; अन्यथा प्रकार वेगळाच घडला असता. जो पकडला होता, त्याला ओळखले होते. सकाळी ५-६ जण पारधी पिढीवर विचारपूस करायला गेल्यावर तेथे दगडफेक आरोपींनी केली. यामुळे तर संशय आणखी बळावला. मग गावकरी एकत्र होऊन ३००-४०० लोक पारधी पिढीवर गेले. लोकांना पाहून आरोपी पळू लागले; परंतु नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.सकाळी दहा वाजता ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. सकाळी ११ वाजता श्वान पथक बोलावण्यात आले. तेथे चोरट्याच्या पडलेल्या शर्टचा श्वानाला वास दिल्याबरोबर श्वान बराच वेळ फिरले. चोरी झालेल्या घराला दोन वेढे टाकून गावाबाहेरील पारधी पेढीवर जाऊन थांबले. आधी जे पाच जण पकडले, त्यातील दोघांच्या घरासमोर श्वान जाऊन उभे राहिले. यावरून पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी यांचा संशय बळावला. याच दरम्यान चोरी गेलेल्या मोबाईलचे कव्हर तेथे सापडले. आरोपी मध्ये धनंजय काळे (रा. पळसे, ता. वाशी), शंकर काळे, रामा शिंदे, शिवा दादा शिंदे (रा. नांदुरघाट) व संतोष काळे (रा कळंब) यांच्यावर गुन्हा दाखल केला.