औरंगाबाद : कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणाºया एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणाºया चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला ३० हजार रुपये बक्षीस दिले.लुटमारीचा कट रचणारा मुख्य आरोपी विष्णू सानप, सतीश पांडुरंग चव्हाण (१९, रा.जयभवानीनगर, वडगाव कोल्हाटी), महेश भाऊसाहेब वेताळ (रा.बालाजीनगर, रांजणगाव शे.पुं.) आणि एका विधिसंघर्षग्रस्त मुलाचा (अल्पवयीन)आरोपीमध्ये समावेश आहे. यातील विष्णू सानप याला डॉ.अनुपम टाकळकर यांना पिस्तूलचा धाक दाखवून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पकडले होते. या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर तो जेलमधून बाहेर आला होता. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले की, वाळूज एमआयडीसीमधील अजिंक्य इंटरप्रायजेस या कंपनीच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे सुपवायझर असलेले दीपक रत्नाकर तौर हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगारांचे वेतन करण्यासाठी रोख २ लाख ९५ हजार रुपये घेऊन दुचाकीने जात होते. यावेळी मराठवाडा आॅटो कंपनीमागील मोकळ्या जागेवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तौर यांना अडविले आणि अचानक त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांनी त्यांच्या गळ्यातील पैशाची बॅग हिसकावून नेली होती.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोहेकॉ वसंत शेळके, कारभारी देवरे, प्रकाश गायकवाड, मनमोहनमुरली कोलमी, बंडू गोरे, सुधीर सोनवणे यांनी तपास सुरू केला.मास्टरमाइंड विष्णू सानप हा पुण्यातील चतुर्शंृगी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पुणे पोलिसांची मदत घेऊन विष्णूला सायंकाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लुटमारी करणाºया चारही आरोपींना घटनेनंतर अवघ्या पाच दिवसांत बेड्या ठोकून त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या डी.बी. पथकाला ३० हजार रुपयांचे बक्षीस देत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.