लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गोविंद गगराणी खून प्रकरणात ताब्यात असलेल्या तिघा संशयितांनी दोन महिन्यांपूर्वी अंबड येथील व्यापाºयाच्या अल्पवयीन मुलाला एक कोटीच्या खंडणीसाठी पळवून नेले होते. मात्र, त्यांचा तो डाव फसला होता, असे सूत्रांनी सांगितले. गोविंदचेदेखील अपहरण करून खंडणी मागण्याची योजना त्यांनी आखली होती.अटक करण्यात आलेल्या नाथसागर रामनाथ जाधव (१९), आकाश अशोक घोडे व अरुण कानिफनाथ मोरे या तिघांना न्यायालयाने शनिवारी ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील मुख्य संशयित अरुण कानिफनाथ मोरे यास पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले होते.गोविंद गगराणीवर तिघेही काही दिवसांपासून पाळत ठेऊन होते. गोविंदला आयटीआय परिसरातील खदानीकडे नेल्यानंतर खंडणीचा फोन कोणी करायचा याबाबत तिघांनी चर्चा केली. गोविंदच्या डोक्यात वार केल्यानंतर तो जोरात किंचाळला. त्याचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेल्या एका घरातून महिला बाहेर आली होती. मात्र, थोड्या वेळाने ती परत आत गेली. बिंग फुटण्याच्या भीतीने या तिघांनी गोविंदचा खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
‘त्या’ तिघांनी दोन महिन्यांपूर्वीही केले होते एकाचे अपहरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:29 AM