शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

आणखी तीन ठिकाणी ‘मास्टर प्लॅन’

By admin | Published: November 14, 2014 12:25 AM

सोमनाथ खताळ , बीड बीड शहरात विविध विकास कामे आजही प्रलंबीत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या बीडकरांची डोकेदुखी ठरत असताना आणखी एक बीड शहराच्या वैभवात भर पडणारे

सोमनाथ खताळ , बीडबीड शहरात विविध विकास कामे आजही प्रलंबीत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या बीडकरांची डोकेदुखी ठरत असताना आणखी एक बीड शहराच्या वैभवात भर पडणारे काम पालीकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. काही महिन्यापूर्वीच कारंजा, बलभीम चौक, माळीवेस रस्त्यांवर मास्टर प्लॅन चे काम झाले होते, त्याच धरतीवर शहरातील आणखी तीन मुख्य रस्त्यांचे रूंदीकरण होणार असून याचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे.बीड शहर विकास आराखड्यांतर्गत शहरातील मुख्य भागातील रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. मागील १४ वर्षापासून प्रलंबीत असलेले हे प्रस्ताव आता लवकरच निकाली लागणार असल्याने बीड शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार असून वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. घरांनी, ओट्यांनी, वाहनांनी आगोदरच रस्ता अरूंद केला आहे. या अरूंद रस्त्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आलेले आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहन जर रस्त्यावरून जात असेल तर दुसऱ्या वाहनाला त्या रस्त्यावरून एन्ट्री सुद्धा नसते, एवढे अरूंद रस्ते शहरातील झाले आहेत.रस्त्याने घेतला मोकळा श्वासतत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या कार्यकालात शहरातील मुख्य आणि वर्दळीचा असणाऱ्या कारंजा ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस दरम्यानच्या रस्त्याचे मास्टर प्लॅन चे काम करण्यात आले होते. हा रस्ता रूंद झाल्याने अनेक दिवसापासून नागरीकांना करावा लागत असलेला त्रास थांबला. आता या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून कसलीच वाहतूक कोंडी होत नाही.कारंजा ते माळीवेस दरम्यान मास्टर प्लॅन चे काम करण्यात आले होते. या मास्टर प्लॅनमध्ये मस्जीद, मंदीर, आले. मात्र जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर, नगराध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, पालीकेचे गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी रस्त्यावर उतरून दोन्ही समाजातील नागरीकांशी संवाद साधला. त्यानंतर नागरीकांना सोबत घेऊन मास्टर प्लॅन चा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजातील नागरीकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून मास्टर प्लॅन च्या काम पार पाडून हम साथ साथ है अशी भूमीका बजावली.नागरीकांनी घेतला होता पुढाकारया रस्त्या दरम्यान अनेकांची घरे, दुकाने येत होती. मात्र शहराच्या विकासासाठी अनेकांनी स्वत: आपली घरे पाडली, दुकाने मागे घेतली आणि प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळेच हा मास्टर प्लॅन सक्सेस झाला.आदेश मिळाले की काम सुरू- शेखसध्या तीन ठिकाणच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. राहिलेल्या तीन रस्त्यांच्या मास्टर प्लॅन चे आदेश मिळाले की लगेच काम सुरू करण्यात येईल असे सहायक नगर रचनाकार सलीम शेख यांनी सांगितले.