परतूर : शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांकडे तब्बल ३१ लाख रूपयांची पालिकेची थकबाकी आहे. सोमवारी वसुली पथकाने सोमवारी शहरातील तीन दुकानांना सील लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या वसूली पथकाने जवळपास ३१ लाख थकबाकी असल्याच्या काराणावरून शहरातील तिन क ार्यालयालयांना सिल लावण्यात आले आहे.शहरात नगर पालिकेकडून विविध करांची वसुली सुरू आहे. ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सोमवारी न. प. च्या वसुली पथकाने परिवहन मंडळ ४ लाख रू. सार्वजनिक बांधकाम विभाग ९ लाख रू. व अन्य एक संस्थेच कार्यालय १८ लाख रू . असे या तीन कार्यालयात वसुलीसाठी मालमत्तेचा अटकाव करण्यात आला. यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने १ लाख ९७ हजारांचा धनादेश देवून उर्वरीत रक्कम ३१ मार्चपूर्वी देण्याचे लेखी दिले. दरम्यान २८ पासून शहरात प्रसिध्द केलेल्या थकबाकीदार यादीपैकी अद्याप कराचा भरणा न केलेल्या मालमत्ता धारकांची मालमत्ता नियमाप्रमाणे जप्ती व अटकाव करून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जाहीर लिलाव होणार असल्याचे मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी सांगितले.
तीन कार्यालयांना ठोकले सील...!
By admin | Published: March 28, 2017 12:07 AM