शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

पाच वर्षांत खोदल्या पावणेतीन हजार विहिरी; अल्पभूधारक शेतकरी अजूनही लाभापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:31 PM

दोन विहिरींतील ५०० फूट अंतराची मर्यादा ठरतेय अडसर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना २ हजार ८३५ विहिरी घेता आल्या. तथापि, अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही पिके घेता यावीत, यासाठी विहिरी खोदण्याची इच्छा आहे; परंतु दोन विहिरीतील ५०० फूट अंतराच्या मर्यादेमुळे इच्छा असूनही अनेकजण या विहिरीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

तथापि, जि.प.चे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले की, सिंचन विहिरींसाठी देखील ५०० फूट अंतराची ही जाचक अट आहे. ती कमी करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जि. प. मार्फत विशेष घटक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनांतर्गत विहिरींसाठीची अंतराची ही मर्यादा कमी करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास अनेकांना विहिरींचा लाभ घेणे सुकर होईल.

अनु. जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत विहिरीसाठी अनुदान दिले जाते. मागासवर्गीय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या योजना अंमलात आणल्या. त्यानुसार सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांत दोन्ही योजनांमध्ये जिल्ह्यात एकूण २ हजार ८३५ विहिरी उभारण्यात आल्या. त्यावर ५४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. सन २०२१-२२ मधील विहिरींची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर सन २०२२-२३ या वर्षात ४५० शेतकऱ्यांनी विहिरींसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक न झाल्यामुळे त्यांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे.

भूजल पातळीजिल्ह्यात सरासरी १२.३५ मीटर खोल एवढी भूजल पातळी आहे. अलीकडच्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. शेतात विंधन विहिरीपेक्षा विहीर खोदणे पर्यावरणाच्या दृष्टीने हिताचे आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचाही हाच अभिप्राय आहे. विंधन विहिरींमुळे भूगर्भातील खोलवरचे पाणी उपसले जात असल्यामुळे भूजलाची पातळी खोल जात आहे. दुसरीकडे, विहिरींमुळे पावसाचे पडणारे पाणी साचले जाते. पाण्याचे झरे सगळीकडे पाझरतात. पाणीपातळी सुरक्षित राहते.

कृषी स्वावलंबन योजना वर्ष- विहिरी२०१७-१८- ४९० २०१८-१९- ६९४ २०१९-२०- ५९८ २०२०-२१- ४९७ २०२१-२२- १६५

कृषी क्रांती योजना वर्ष- विहिरी२०१७-१८- १६२०१८-१९- १६७२०१९-२०- १३२२०२०-२१- ७२२०२१-२२- ०४

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती