लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : अथक मेहनत करून जगविलेल्या कांद्याला वैजापूर बाजार समितीत ५२ रुपये क्विंटल एवढा मातीमोल भाव मिळत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वैजापूर येथील भरचौकात ट्रॅक्टरभर कांदा फेकून आपला संताप व्यक्त केला. मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर फेकल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने कांदा रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथील शेतकरी प्रमोद गायकवाड यांनी बुधवारी १ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते. कांद्याचा लिलाव सुरू झाला. त्यावेळी त्यांच्या कांद्याची ५२ रुपये प्रतिक्विंटल बोली लावली गेली. यामुळे गायकवाड यांचा चांगलाच तीळपापड झाला. एवढी मेहनत घेऊन जगविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत नसेल तर फेकून दिलेला बरा असे म्हणत ते कांदा मार्केटच्या बाहेर पडले.यानंतर सदर शेतकºयाने वैजापूर येथील मुख्य चौक गाठला व येथेच अख्खे ट्रॅक्टर खाली करून आपला रोष व्यक्त केला. कांदा मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी वाहतूक खर्च २ हजार रुपये लागला. अन् बाजार समितीत कांद्याला ५२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे संताप अनावरण होऊन दोन ट्रॅक्टर कांदा (३० क्विंटल) रस्त्यावर फेकून दिल्याचे सदर शेतकºयाने सांगितले.दरम्यान, कांदा रस्त्यात टाकल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच भर रस्त्यात टाकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. येथील प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली असता वैजापूर पोलीस ठाण्याचे पोनि. अनंत कुलकर्णी, पोलीस नाईक संजय घुगे, मनोज कुलकर्णी आदींनी वैजापूर येथील मुख्य चौकात धाव घेतली. यानंतर नगरपालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने कांदा रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.७०० वरून भाव थेट ५२ रुपयांवरदोन दिवसांपूर्वी या कांद्याला ५०० ते ७०० रुपये दर मिळाला होता. बुधवारी मात्र, हा दर थेट ५२ रुपयांवर आल्याने शेतकºयाचा संताप अनावर झाला. उत्पादन खर्च आणि मिळणाºया उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकºयांस मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.४विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी याच कांदा मार्केटमध्ये कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांनी जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे तहसीलदारांसह पोलीस अधिकाºयांना मध्यस्थी करावी लागली होती. आता पुन्हा सदर शेतकºयाने कांदा रस्त्यावर फेकल्याने कांदा मार्केट पुन्हा चर्चेत आले आहे.
मातीमोल भावामुळे कांदा फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:25 AM