शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

डॉक्टरांचेही घर फोडले चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Published: November 14, 2015 12:15 AM

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ तीन ठिकाणी चोऱ्या करून

उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ तीन ठिकाणी चोऱ्या करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साधारणत: दोन लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सांजा रोड भागातील काका नगर परिसरात राहणारे सुलेमान रज्जाक निचलकर यांच्या पत्र्याच्या शेडचा पत्रा फाडून सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ आतील ४५ हजार रूपये किंमतीचे ६० किलोचे दोन सुपारीचे पोते हातोहात लंपास केले़शहरातील तांबरी विभागातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे राजकुमार हरिदास भोयटे हे सोमवारी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेले होते़ तर त्यांच्या घरची मंडळी सणानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या़ घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ आतील एक संगणक, तीन तोळे सोन्याचे दागिने, रोख १५०० रूपये, साड्या आदी १ लाख १६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत राजकुमार भोयटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलिस करीत आहेत. (वार्ताहर) नळदुर्ग : अज्ञात चोरट्यांनी परमीट रुमच्या चॅनलगेटचे कुलूप आत प्रवेश मिळवित रोख रक्कमेसह पावणेचार लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे घडली. याबाबत किरण त्रिंबक गंगणे यांनी नळदुर्ग पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळकोट येथे त्यांच्या मालकीचे बिअरबार परमीट रूम आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारच्या मध्यरात्री ते फोडून आतमध्ये प्रवेश करुन काऊंटरमध्ये ठेवलेले रोख ३ लाख, दिवसभराच्या गल्ल्याचे ४० ते ४५ हजार, चिल्लर नाणी ९ हजार व ३ तोळ्याच्या अंगठ्या असे एकंदरीत ३ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोउपनि पठाण हे करीत आहेत.शहरातील महात्मा गांधी नगर भागात राहणारे डॉ़ मुकुंद तावरे यांचे घरही सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ डॉ़ तावरे यांच्या घरातील सोन्याची अंगठी, संगणकाचा माऊस, की-बोर्ड, चांदीचा रंगनाथ, देव्हाऱ्यासमोर ठेवलेले पैसे असा मुद्देमाल लंपास केला़चोऱ्यांचे सत्र थांबेना४मागील आठवड्यापासून जिल्ह्यात चोऱ्यांचे सुरू झालेले सत्र थांबण्याचे नाव घेत नाही़ येडशी, भूम तालुक्यातील ईट, वाशी तालुक्यातील तेरखेडा व उस्मानाबाद शहरात चोऱ्या झाल्या आहेत़ वाढत्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़