छत्रपती संभाजीनगर : सामाजिक माध्यमांवर विविध विषयांवर पोस्ट लिहायची, मोबाइलवर तासन्तास चॅटिंग करायची, मेसेज करायचे म्हटले तर मोबाइल, लॅपटाॅपचा वापर करावाच लागतो. त्यामुळे हल्ली मोबाइल, लॅपटाॅपचा वापर वाढला आहे आणि त्यातूनच बोटांची दुखणी वाढली आहेत.
मोबाइल, संगणकाचा वापर वाढलाकोरोना प्रादुर्भावानंतर मोबाइल, संगणकाचा वापर वाढला आहे. सामाजिक माध्यमांवर सक्रिय राहण्यासाठी सतत मोबाइल वापरला जातो. शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोबाइलचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
‘लॅपटॉप एल्बो’चे रुग्ण वाढलेलॅपटाॅप, संगणकावर सतत काम करणाऱ्या व्यक्तींच्या हाताच्या कोपऱ्याला त्रास उद्भवतो. यालाच लॅपटाॅप एल्बो, असे म्हटले जाते. हा त्रास टाळण्यासाठी संगणकावर काम करताना हात योग्य पद्धतीने ठेवावेत.
काय आहे टेक्स्टिंग थंब?टेक्स्टिंग थंबला ट्रिगर थंब असेही संबोधले जाते. यात रुग्णांना वेदना होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये बोट वाकणे किंवा लांब करताना वेदना होतात. मोबाइलवरून सतत मजकूर पाठवण्यामुळे हा त्रास उद्भवू शकतो.
काय काळजी घ्याल?मोबाइल, लॅपटाॅपचा अतिवापर टाळावा. मोबाइलवरून सतत लांब मेसेज करण्यातून अंगठ्याचे दुखणे वाढते. संगणकाच्या की-बोर्डद्वारे मजकूर टाइप करण्यावर भर द्यावा.
अंगठ्याचा व्यायाम कसा कराल?प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तो स्वत:च्या प्रकृतीनुसार योग्य आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घेतले पाहिजे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. अंगठ्यासह हाताच्या बोटाची हालचाल होईल, असे विविध व्यायाम करता येतात.
पुरेसा आराम द्यावामोबाइल, लॅपटाॅपमुळे हाताचा, बोटांचा वापर वाढला आहे. त्यातून बोटांच्या जाॅइंट्सवर फारसा परिणाम होत नाही. मात्र, रुग्णांच्या बोटांना त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे बोटांनाही पुरेसा आराम दिला पाहिजे. मोबाइलचा अतिवापर टाळावा.- डाॅ. अनिल धुळे, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, घाटी