औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचा झंझावात सोमवारी सकाळी पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानननगर भागात पोहोचला. जय हनुमान मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला. सकाळी ८.३० वाजता पदयात्रा हनुमाननगर भागात पोहोचताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व फु लांच्या वर्षावात राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पुढे पदयात्रा मातोश्रीनगर भागात पोहोचली. प्रत्येक मतदारांशी संवाद साधण्यावर राजेंद्र दर्डा यांनी भर दिला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. महिलांनी राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचे दारात रांगोळी काढून स्वागत केले. तसेच राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे गजानननगर भागातील गल्ल्यांमध्ये पदयात्रा येताच या भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वच गल्ल्यांमध्ये राजेंद्र दर्डा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या भागातील महारुद्र हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर व महादेव मंदिरात राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. येथील थोरा- मोठ्यांनी राजेंद्र दर्डा यांना आशीर्वाद व विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे पुंडलिकनगर भागातील गल्ल्यांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. अनेक मतदार राजेंद्र दर्डा यांचे पुष्पहार घालून स्वागत करीत होते. पदयात्रा पुंडलिकनगरच्या मुख्य रस्त्यावर पोहोचल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील दुकानदारांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले.सकाळी ११ वाजता पुंडलिकनगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोशनगेट परिसरात उत्साह सायंकाळी बायजीपुरा भागातील गफू र चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. शेकडो कार्यकर्त्यांनी राजेंद्र दर्डा यांचे प्रचंड उत्साहात स्वागत केले. पुढे पदयात्रा नागसेन कॉलनीमार्गे कैसर कॉलनीत पोहोचली. पदयात्रा जशी पुढे जात होती तसे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत होते. पदयात्रा पुढे रोशनगेट रोडवरील अझम कॉलनी, मुजीब कॉलनी याठिकाणी पोहोचली. युवकांचा उत्साह पदयात्रेत चैतन्य निर्माण करण्याचे काम करीत होता. यावेळी युवकांनी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. पुढे कटकटगेट परिसरातील युनूस कॉलनी, करीम कॉलनी, मकसूद कॉलनी भागात पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर म्हाडा कॉलनी भागात राजेंद्र दर्डा यांनी प्रत्येक घरात जाऊन मतदानाचे आवाहन के ले. रात्री ७.३० वाजता चंपा चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत वॉर्ड क्र. ८४ कल्पतरू सोसायटी, शिवनेरी कॉलनी, ८२ भारतनगर या भागांमध्ये काढण्यात येणार आहे. पदयात्रेची सुरुवात मातोश्री चौकातून होणार असून, समारोप स्वामी समर्थनगर, नवनाथनगर भागात होणार आहे. ४सायंकाळी ४.३० ते ८ या वेळेत पदयात्रा वॉर्ड क्र. ४० नवाबपुरा, ४१ शहाबाजार या भागात काढण्यात येणार आहे. नवाबपुरा येथील हरी मशीद येथून सुरुवात होऊन चंपाचौक, बहार हॉटेल, बक्कलगुडा या भागात पदयात्रेचा समारोप होणार आहे.
राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचा झंझावात
By admin | Published: September 30, 2014 1:19 AM