शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

औरंगाबादकरांना भरतेय गुलाबी थंडीची हुडहुडी, तापमानाचा पारा उतरणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 10:19 PM

औरंगाबाद : असह्य उन्हाळाचा चटका आणि बहुतांश पावसाळ्यातही गरमीने हैराण राहिलेल्या औरंगाबादकरांसाठी यंदाचा हिवाळा दिलासा देणारा ठरत आहे.

औरंगाबाद : असह्य उन्हाळाचा चटका आणि बहुतांश पावसाळ्यातही गरमीने हैराण राहिलेल्या औरंगाबादकरांसाठी यंदाचा हिवाळा दिलासा देणारा ठरत आहे. शहराचा पारा दिवसागणिक हळूहळू घसरत असून, डिसेंबर महिना चांगलाच हुडहुडी भरविणारा ठरणार आहे. शहराचे तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले असून, पहाटेच्या वेळी थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे.दिवाळीनंतर तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस जेमतेम थंडीचा सामाना करावा लागला. ११ नोव्हेंबर रोजी शहराच्या तापमानाने १३ अंश सेल्सिअस ही नीच्चांकी गाठली. पारा असाच कमी होत जाणार, अशी अपेक्षा असताना मात्र १२ नोव्हेंबरपासून तापमानात वाढ दिसून आली. वातावरणात अचानक आलेल्या बदलामुळे ऐन थंडीत गरमी अनुभवयाला मिळाली. औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात सरासरी १५ अंश सेल्सिअस ताममान असते. मात्र, २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान पारा २१ अंशापर्यंत पोहोचला.त्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागताच अनेकांनी कपाटातून बाहेर काढलेले उबदार कपडे पुन्हा पेटीत ठेवावे लागले. मात्र, २४ तारखेपासून थंडी वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली. १ डिसेंबर रोजी शहरात चिकलठाणा वेधशाळेने १४.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांत शहराचा पारा १४-१५ अंशांच्या आसपास खेळत राहणार आहे. ज्याप्रमाणे मान्सून काळात शेवटी-शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्याप्रमाणे पुढील दोन महिन्यांत कडाक्याची थंडी पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात तापमान दहा अंशाच्या खाली उतरण्याचा अंदाज आहे. वाढलेल्या थंडीमुळे मलेरिया, खोकला, सर्दी, पडसे, ताप, तसेच घशांच्या आजारांपासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.आला थंडीचा महिना...थंडीचा तडाखा जाणवू लागल्याने रात्री रस्त्यांवरील गर्दीदेखील कमी झाली आहे. नागरिक घरातील उबदार वातावरणात राहणे पसंत करीत आहेत. रस्त्याच्या कडेला शेकोट्याही पेटलेल्या असून, सकाळी सकाळी गोड गुलाबी थंडीच्या प्रसन्न वातावरणात कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी लोक आतुर दिसत आहेत. लहान मुलांच्या आरोग्यावर थंडीच परिणाम होऊ नये म्हणून पालक मुलांना उबदार कपडे घालूच शाळेत पाठवत आहेत. थंडीमुळे वर्षभर कपाटात पडून राहिलेल्या स्वेटर-मफलरच्या घड्या मोडल्या असून, अनेक जण, तर दिवसाही उबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे निसर्गालाही चांगलीच झळाळी मिळाली आहे. कोरडे वातावरणा आणि निसर्गाला आलेला टवटवीतपणा हौशी पर्यटनप्रेमींचे जथे म्हैसमाळ-दौलताबादकडे जाण्यास मोहित करीत आहे. तसेच हिवाळ्यात व्यायामाचा चंग बांधलेले अनेक जण सार्वजनिक बागा आणि जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. मसाला दूध विक्रीनेही जोर धरलेला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद