औरंगाबाद : अल्पावधीतच लोकप्रिय झालेले टिकटॉक अॅप अचानक बंद झाल्यामुळे हे अॅप ज्यांच्याकडे नाही, त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. औरंगाबादकर तरुणाईही या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झाली आहे. कला क्षेत्रातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी हे अॅप फारच उपयुक्त होते, अशी प्रतिक्रिया काही तरुणांनी दिली.जगभरातील १०० क ोटींपेक्षाही अधिक लोक टिकटॉक अॅप वापरत आहेत. नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे गुगलने गुगल स्टोअरवरून टिकटॉक अॅप काढून टाकले. यामुळे आता नव्याने हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही; पण ज्यांच्याकडे हे अॅप आधीपासूनच आहे, त्यांच्यावर मात्र या निर्णयाचा काहीही परिणाम झालेला नसून त्यांचे अॅप सुरळीतपणे सुरू आहे. टिकटॉक बंद होताच भारतातील नेटीझन्सनी या अॅपबाबत आॅनलाईन सर्च करायला सुरुवात केली असून, गुगल सर्च ट्रेंडस्ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या माहितीनुसार ‘टिकटॉक अॅप डाऊनलोड’ असे शब्द सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहेत.याबाबत सांगताना काही तरुणांनी सांगितले की, कला क्षेत्रातील लोकांसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त आहे. कला क्षेत्रातील ‘स्ट्रगलर्स’चे प्रमाण मोठे असून, या क्षेत्रातील तरुणाईला फक्त एका संधीची गरज आहे; पण प्रत्येकालाच ही संधी मिळते असे नाही. त्यामुळे कला क्षेत्रातील अनेक तरुण आपल्या लहान-लहान ध्वनिचित्रफिती (व्हिडिओ) बनवून ते सोशल मीडियाच्या साहाय्याने हजारो लोकांपर्यंत पोहोचवतात. यातून किती जणांना संधी मिळते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून आम्हाला आमची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते आहे, हेच महत्त्वाचे असल्याचे काही तरुणांनी सांगितले.प्रतिक्रिया-१. कला सादर करण्याची संधी-मी पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. मला सूत्रसंचालन करण्याचीसुद्धा आवड आहे. त्यामुळे मी माझे काही छोटे-छोटे व्हिडिओज बनवून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवते. माझे अनेक मित्र- मैत्रिणीही या अॅपचा अशाच प्रकारे उपयोग करतात. हे अॅप मला खूप आवडते, कारण यामुळे कला सादर करण्यासाठी आणि कलात्मकतेसाठी खूप वाव मिळतो. त्यामुळे आमच्या सारख्या हौशी तरुणाईसाठी उपयुक्त असणारे हे अॅप का बंद केले, असे वाटते.- अर्चना साळवी२. गमतीदार व्हिडिओज करणे आवडते-टिकटॉक अॅपचा मला फार काही उपयोग होत आहे, असे नाही; पण सहज करमणूक म्हणून हे अॅप चांगले आहे. या अॅपचा उपयोग करून काही गमतीदार व्हिडिओज तयार करणे मला आवडते. नव्याने अॅप डाऊनलोड करणे बंद झाले म्हणून थोडे वाईट वाटले, पण त्यामुळे फार काही फरक पडेल असे वाटत नाही.- वेदिका देशपांडे
‘टिकटॉक’मुळे मिळतो कलात्मकतेला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:55 PM
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले टिकटॉक अॅप अचानक बंद झाल्यामुळे हे अॅप ज्यांच्याकडे नाही, त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. औरंगाबादकर तरुणाईही या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झाली आहे. कला क्षेत्रातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी हे अॅप फारच उपयुक्त होते, अशी प्रतिक्रिया काही तरुणांनी दिली.
ठळक मुद्देसोशल मीडिया : कुणासाठी ‘टाईमपास’, तर कुणासाठी महत्त्वाचे होते ‘टिकटॉक’ अॅप