बिडकीन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामसेवक शिंदे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून, या प्रकरणावरून ग्रामसेवक संघटना संतप्त झाली आहे.
१८ जानेवारी रोजी बिडकीन ग्रामपंचायतीची पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अचानक तपासणी केली. तेव्हापासून ग्रामसेवक संजय शिंदे हे तणावात दिसून आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे ग्रामसेवक संघटना संतप्त झाली असून, पंचायत समिती प्रशासनाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
फोटो : ग्रामसेवक संजय शिंदे