औरंगाबाद : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळवून दिले. राष्ट्र घडविला असेल, पहिले स्वतंत्र दिले ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे, 'गड किल्ल्यांचे महत्त्व काय', यावर पीएचडी करणार असे, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत निमित्त १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान ’शिवजन्मोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाचे उद्घाटन मंगळवारी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र संचालक डॉ.आनंद देशमुख यांची उपस्थिती होती
शिवजन्मोत्सवात होणारे कार्यक्रम...विद्यार्थी विकास मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र यांच्यावतीने कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. धनजंय आकात यांचे ’स्पर्धा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास सामोरे जातांना’ या विषयावर गुरुवारी (दि.१६) महात्मा फुुले सभागृहात व्याख्यान होईल. शाहीर अजिंक्य लिंगायत यांचा याच दिवशी सायंकाळी विद्यापीठ नाटयगृहात पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे. तर शिवशाहिर पुरुषोत्तम राऊत यांचा ’रायगडचा छत्रपती’ हा शाहीरीचा कार्यक्रम शनिवारी (दि.१८) सायंकाळी नाटयगृहात होईल. शिवजयंतीदिनी (दि.१९) नांदेडच्या यशवंत महाविद्यालयतील प्रा.विश्वाधर देशमुख यांचे ’शिवरायांसाठी का आठवावे’ या विषयावर व्याख्यान होईल. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच दिवशी सकाळी ८ वाजता शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल. या संपूर्ण सोहळयास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान व संचालक डॉ.आनंद देशमुख यांनी केले आहे.