उमरगा/लोहारा : उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांना ‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगत शिवसेनेच्या वतीने मंगळवारी उमरगा, लोहारा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खा. गायकवाड यांना ‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्याने उद्धट वागणूक दिली. असे असतानाही ‘एअर इंडिया’सह इतर विमानसेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकून विमान प्रवासावर बंदी घालून एकप्रकारे अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थच सोमवारी शहर बंदचे आवाहन करण्यात आले असल्याचे वरनाळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, उमरगा-लोहाऱ्यासोबतच इतर काही शहरांमध्येही बंद पाळला जाणार आहे.
आज उमरग्यासह लोहारा शहर बंद
By admin | Published: March 26, 2017 11:09 PM