जालना : नवीन शैक्षणिक वर्षास १६ जूनपासून प्रारंभ होत असून, विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थ्यांनी लागणारी वह्या, पुस्तके तसेच शैक्षणिक साहित्याची खरेदीही केली असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.केंद्रापासून शाळांपर्यंत मुख्याध्यापकांनी पुस्तके आणावी, असे शिक्षण विभागाने संकेत दिले होते. त्यानुसार मुख्याध्यापकांनी शाळांपर्यंत पुस्तके नेली. तालुका निहाय याप्रमाणे पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहणार नाही, याची खास काळजी घेण्यात आली आहे. यंदाच्यावर्षी पाचवीसाठी स्वाध्याय पुस्तिका दिल्या जाणार नाहीत. सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांना हिंदी वगळता सर्वच प्रकारची स्वाध्याय पुस्तिका दिल्या जातील, असे समन्वयक मावकर यांनी सांगितले. मराठी, हिंदी, उर्दू व अन्य माध्यमांची १६ लाख ७४ हजार ७१९ पुस्तके मागविण्यात आली आहेत. मराठी माध्यमाची सर्वच पुस्तके प्राप्त होऊन ती शाळांना वाटप करण्यात आली आहेत. अन्य माध्यमाची ७ टक्के पुस्तके येणे बाकी आहे. आतापर्यंत सर्वच माध्यमांची १५ लाख ४८ हजार ३८६ पुस्तके प्राप्त झाली आहेत. त्याचे प्रमाण ९३ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे २ लाख ७४ हजार विद्यार्थी आहेत. त्यात मुलींचे प्रमाण ४५ टक्के आहे. जालना तालुक्यात मराठी माध्यमाची ३ लाख ३६ हजार ८८६, उर्दू माध्यमाची ५३ हजार २९१, इंग्रजी माध्यमाची ३ हजार ४८७ याप्रमाणे ४ लाख १२ हजार ८७३ पुस्तके मागविण्यात आली आहेत. घनसावंगी तालुक्यात सर्वच केंद्रांवर पाठ्यपुस्तके पोहोच करण्यात आली आहेत. सर्वच पुस्तके प्राप्त झाली आहेत. गेल्या आठवड्यात स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप पूर्णपणे होऊ शकले नव्हते. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी स्वाध्याय पुस्तिकांचेही वाटप केल्याची माहिती घनसावंगीचे गटशिक्षणाधिकारी विपूल भागवत यांनी दिली. एकूणच गेल्या दोन महिन्यांचा सुट्यांचा काळ संपवून विद्यार्थी परत शाळेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. बहुताश शाळामध्ये मुख्याध्यापकांनी रविवारी जाऊन पुस्तके वाटपाची तयारी केली. (प्रतिनिधी)शाळांना पुस्तके वाटपशिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीची सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्यात मराठी, उर्दू, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळांना पंचायत समितीस्तरावरून केंद्रापर्यंत पाठ्यपु्स्तके दिली आहेत. एका शाळेसाठी तेलगू भाषेतील पाठ्यपुस्तके दिली आहेत.
आज शाळेचा पहिला दिवस
By admin | Published: June 16, 2014 12:14 AM