लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सीएमआयएच्या ब्राऊनफील्ड देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि.चा भूमिपूजन समारंभ सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वा. होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे यांची उपस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योगांचा तसेच भविष्यात येणा-या उद्योगाचा विचार करून इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर निर्माण करण्यात येणार आहे.हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार असून, यामध्ये १७ कोटी ५४ लाखांची उपकरणे-यंत्रसामग्री असेल. केंद्र शासनाकडून ७५, राज्य शासनाकडून १०, तर स्थानिक उद्योजकांकडून १५ टक्के निधी उभारला जाईल. सिस्टिम डिझाइन व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेंद्रा औद्योगिक परिसरात हे क्लस्टर उभारण्यात येणार आहे.देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि. या क्लस्टरच्या बांधकामानंतर मराठवाड्यातील सुमारे ५० लघुव मध्यम उद्योगांना फायदा होईल, असा दावा सीएमआयने केलाआहे.
इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे आज भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:22 AM