शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

जायकवाडी धरणातून आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 9:03 PM

जायकवाडी धरणातून २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी जायकवाडी प्रशासनाने घेतला.

ठळक मुद्देधरण ९७ टक्क्यांवर

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून  २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी जायकवाडी प्रशासनाने घेतला.गुरुवारी जलसाठ्याने ९७ ही टक्केवारी ओलांडली होती. गुरुवारी सायंकाळी धरणाची  पाणीपातळी १५२१ फूट झाली होती. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त एक फूट राहिले आहे. धरणात एकूण जलसाठा २७८९.६३० दलघमी, तर उपयुक्त जलसाठा २०५१.५१४ दलघमी झाला आहे. धरणात ७९४३० क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने सकाळपर्यंत धरण काठोकाठ भरणार आहे. आवक लक्षात घेता शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय जायकवाडीचे अधीक्षक अभियंता तांदळे व मुख्य अभियंता स्वामी यांनी घेतला, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.जायकवाडी धरणाच्या मुक्तपाणलोट क्षेत्रात येणाºया अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यातच औरंगाबाद येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात गुरुवारी सायंकाळी ७९४३० क्युसेक एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमुहातील विसर्ग गुरुवारी घटविण्यात आले आहे. भंडारदरा धरणातून फक्त ८०१ क्युसेक, दारणा धरणातून ११०० क्युसेक, गंगापूर (नाशिक) धरणातून ११०६ क्युसेक विसर्ग ठेवण्यात आले आहेत, नांदूर मधमेश्वर बंधाºयातून ३१५५ क्युसेक गोदावरीत व ओझरवेअर बंधाºयातून ५०४५ क्युसेक पाणी प्रवरेत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक घटणार असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाºया औरंगाबाद, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, राहुरी, अमरापूर, लोणी, आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू असल्याने हे पाणी गतीने जायकवाडी धरणात जमा होत आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी गतीने वाढत आहे.जायकवाडीलगतच्या तालुक्यात अतिवृष्टीजायकवाडी धरणाच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, शेवगाव, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, आदी तालुक्यात बुधवारी तुफान अतिवृष्टी झाली. श्रीरामपूर १६३ मि. मी., लोणी ११४ मि.मी., राहुरी १४१ मि.मी., अमरापूर ६५ मि.मी., नेवासा २४ मि. मी., कोपरगाव ४८ मि. मी., नागमठान ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली.