लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : घोषणापत्र देवूनही यादीत नाव आले नाही, २५ क्विंटलपेक्षा जास्त तूर खरेदी करता येत नाही, पंचनामा करूनही तुरीचा निरोपच आला नाही, शेतातील गोदामात ठेवलेली तूर पावसामुळे रस्ता खचल्याने बाहेर काढणे शक्य नाही, अशा कारणांनी शेकडो शेतकºयांची तूर अजूनही घरातच पडून आहे. खा.राजीव सातव यांच्यासमोर शेतकºयांनी कैफियत मांडल्यानंतर प्रशासन शासन आदेशाचे कारण समोर करीत आहे. याविरोधात जिल्हा कचेरीसमोर १ सप्टेंबर रोजी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तूरप्रश्नी लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर खा.राजीव सातव यांनी याची दखल घेत हिंगोली बाजार समितीतील केंद्राला भेट दिली. त्यावेळी शेकडो शेतकºयांनी त्यांच्याकडे विविध समस्या मांडल्या. यात बाजार समितीने घोषणापत्र दिल्यानंतरही आमचे तूर खरेदीच्या यादीत नाव नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. यात विजय महाजन, संजय महाजन, साहेबराव गुठ्ठे, कल्याण गुठ्ठे, साहेबराव गुठ्ठे, कावेरी गुठ्ठे, हनुमान थोरात, गणेश थोरात, जगन्नाथ थोरात, त्रिवेणी गुठ्ठे, सोपान नागरे, पांडुरंग ढाले यांच्यासह अन्य पंधरा ते वीस शेतकºयांचा समावेश आहे. यातील काही शेतकºयांची नावे उपविभागीय अधिकारी कार्यालयाला पाठविलेल्या यादीत असल्याचे बाजार समितीचे सचिव जब्बार पटेल यांनी सांगितले. तर एका शेतकºयाची ४३ क्ंिवटल तूर असताना व त्यांच्या ३0 पोत्यांचा पंचनामा महसूल विभागाने केलेला असताना केवळ २५ क्ंिवटलच तूर खरेदी केली जात होती. विशेष म्हणजे मोजणी सर्वच तुरीची करून पावती २५ क्ंिवटलचीच दिली. शासनानेच यापेक्षा जास्त तूर न घेण्यास सांगितल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारीही सांगत होते. यावरून खा.सातव चांगलेच संतापले होते. प्रत्येक यंत्रणेकडून वेगळी उत्तरे मिळत होती. प्रत्यक्षात असा कोणताच आदेश नसल्याचे उपनिबंधक सुधीर म्हेत्रेवार यांनी सांगितले. तर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोविंद भवर यांनीही तसा आदेश नसल्याचे सांगितले. असे अनेक प्रश्न खासदारांसमोर शेतकºयांनी मांडले. त्यानंतर १९७ शेतकºयांची यादी पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयास पाठविल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आज शेवटचा दिवस असल्यास या तुरीचे काय? असा सवाल करून खा.सातव यांनी जिल्हा कचेरी गाठली. तेथे पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांच्याशी चर्चा केली. तेथेही पुन्हा शेतकºयांनी त्याच समस्या मांडल्या. तर हा प्रश्न जिल्हाधिकाºयांच्या कानावर घालून खºया शेतकºयांची तूर शासन खरेदी करणार नसेल तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे यांनी महसूल प्रशासनाने तुरीची घरोघर तपासणी करायची होती तर याद्या असूनही त्याला विलंब का केला? असा सवाल केला. जवळा बाजार समितीचे सभापती अंकुश आहेर यांनीही वसमतच्या याद्या आल्या नसल्याचे सांगितले.यावेळी सातव यांच्यासमवेत अॅड. बाबा नाईक, जि.प.सदस्य सतीश पाचपुते, केशव नाईक, नगरसेवक शेख नेहालभैय्या, आरेफ, माबूद बागवान, श्यामराव जगताप, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.३0 आॅगस्ट रोजी ४५ शेतकºयांची १0८२ क्विंटल तुरीची मोजणी झाली होती. त्यात अनेकांना त्याच्या पावत्या मिळाल्या नसल्याने मात्र आज सकाळी बोंब पहायला मिळाली. सुटीचा दिवस असल्याने बाजार समितीचा कर्मचारीच नव्हता. ३१ आॅगस्ट रोजी ४२ शेतकºयांची ७६३.५0 क्विंटल तूर खरेदी केली. १९१ शेतकºयांची यादी बाजार समितीकडे आली असताना केवळ ८७ शेतकºयांचीच तूर खरेदी झाली. या यादीतीलही सर्व शेतकºयांपर्यंत संदेश गेलाच नसल्याचे दिसून येते.
तूरप्रश्नी काँग्रेसचे आज धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:05 AM