शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

आजचे राशिभविष्य, दि. १ डिसेंबर २०२०, डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद

By | Published: December 02, 2020 4:04 AM

डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२० राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १०, १९४२. तिथी : कार्तिक ...

डॉ. मनीषा देशपांडे, औरंगाबाद

मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२०

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन १०, १९४२. तिथी : कार्तिक कृष्ण प्रतिपदा. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर, नक्षत्र : सकाळी ८:३१ पर्यंत रोहिणी. त्यानंतर मृग. रास : रात्री ९:३७ पर्यंत वृषभ. त्यानंतर मिथुन. आज : चांगला दिवस. राहू काळ : दुपारी ३ ते ४:३० (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा)

.........................................

मेष :

कामाचा व्याप वाढेल. शांत डोक्याने जबाबदारी पूर्ण करा. मित्रांबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. स्पष्ट बोलून शंका दूर करा. काहींना हक्कासाठी झगडावे लागेल. डोक्यात चाललेला गोंधळ मोठ्यांशी बोलून दूर करा.

वृषभ :

समोरच्याचे बोलणे ऐकून मत बनवा.

काही वेळेला आपण स्वतःचे मत बनवून मोकळे होतो. घरात जास्त वेळ देण्याची गरज पडेल. मोठ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.

मिथुन :

स्वतःसाठी खरेदी करण्यात मजा येईल.

काहींना एखाद्या कार्यक्रमाला हजर राहावे लागेल. ओळखीची चार माणसे भेटल्यामुळे उत्साह वाढेल. महिलांना मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.

कर्क :

बऱ्याच दिवसांनी निवांत आहात.

त्याचा पूर्ण आनंद घ्या. महत्त्वाचे निर्णय आईला विचारून घ्या. खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करू नका. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह :

मेहनत करूनही यश मिळत नव्हते. ते आता दिसायला लागेल. काहींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी बिघडलेले संबंध सुधारतील. तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल.

कन्या :

कामात अपेक्षित बदल होतील.

नोकरी करीत असाल तर मनासारखे काम मिळेल, तसेच वरिष्ठांकडूनही काम मिळेल. व्यापारीवर्गाला चांगला काळ आहे. बच्चेकंपनी मित्रांसह खुश राहतील.

तूळ :

फिरतीची कामे असणाऱ्यांना लाभ होईल.

मनासारखी कामे होतील. त्यामुळे छंद जोपासायला वेळ देता येईल. महिलांना नातेवाईकांसाठी वेळ द्यावा लागेल. काहींना आर्थिक मदत करावी लागेल.

वृश्चिक :

व्यावसायिकांना चांगला प्रस्ताव मिळेल.

थोडी हिंमत केली तर मनासारखा लाभ मिळेल. काहींना कामाचे स्थान बदलावे लागेल. घरच्या लोकांची साथ मिळेल. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.

धनू :

लग्नकार्यात भाग घ्याल.

किंवा तसे निमंत्रण येईल. सरकारी कामे पूर्ण करा. आर्थिक व्यवहाराचा हिशोब नीट ठेवा. व्यावसायिकांनी पूर्ण कामाचा आढावा घ्यावा.

मकर :

खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष द्या.

तब्येतीच्या कुरबुरी राहतील. घरासाठी जे प्रयत्न करीत असतील त्यांना अपेक्षित घर मिळेल. वाहन चालविताना काळजी घ्यावी. दुरुस्तीचे काम करावे लागेल.

कुंभ :

मुलांसाठी विशेष वेळ द्यावा लागेल.

काहींना मुलांसाठी प्रवास करावा लागेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर वस्तू सांभाळा. चोरीची शक्यता आहे. बाकी लोकांना सामान्य दिवस.

मीन :

चांगला दिवस आहे.

विशेषत: आर्थिक व्यवहाराशी संबंधित व्यवसाय असेल तर आपणास चांगला दिवस आहे. स्थावर मालमत्तेचे काही वाद चालू असतील, तर ते मार्गी लागतील. महिलांना घरात काही बदल करावा लागेल.