शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
2
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
3
Ganesh Visarjan 2024 Live: किनाऱ्यावर भाविकांची गर्दी; 'लालबागचा राजा'चं समुद्राकडे मार्गक्रमण
4
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
5
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
6
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
7
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
9
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
10
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
11
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
12
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
13
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
14
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
15
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
16
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
18
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
19
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
20
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप

गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू; चाळीस तासांची झुंज ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 3:24 PM

बापाचा हलगर्जीपणा बेतला मुलाच्या जीवावर, आईचा आक्रोश मन हेलावणारा...

जयेश निरपपळ  

गंगापूर: (औरंगाबादशहरातील अहिल्यादेवी नगर येथे शुक्रवारी सायंकाळी घरात झालेल्या गोळीबारातील जखमी चिमुकल्याचा छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी(२७) रोजी सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड (वय अडीच वर्षे)असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी मृत मुलाचा बाप राहुल राठोड याच्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील अहिल्यादेवीनगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर बीड येथील दाम्पत्य राहुल कल्याण राठोड(२९)पत्नी संगीता व अडीच वर्षांच्या मुलगा आर्यनसह भाडेकरू म्हणून राहत होते. राहुल हा शहरातील कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता.

या घटनेत आर्यनच्या डोक्याच्या मधोमध गोळी लागली होती, त्यामुळे खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अत्यवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर घाटीतील अतिदक्षता विभागात आर्यनची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र त्याची चाळीस तासांची झुंज शेवटी अपयशी ठरली व चिमुकल्या आर्यने रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.

आईचा आक्रोश मन हेलावणारा

गोळीबार प्रकरणाला कारणीभूत असलेला आर्यनचा बाप राहुल पोलीस कोठडीत असल्याने आर्यनजवळ आई व इतर कुटुंबीय होते. दरम्यान रविवारी सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देतात आर्यनच्या आई संगीता राठोड यांनी घाटी रुग्णालयात आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह उपस्थितांचे डोळे पानावले होते, आई संगीता यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

आरोपी बापावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा

घटनेचा सूत्रधार मृत मुलाचा बाप राहुल कल्याण राठोड याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता . आरोपीस शनिवारी सायंकाळी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने राहुल राठोड यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान जखमी आर्यनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यांच्या कलमात वाढ केली असून आरोपी राहुल कल्याण राठोड याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील दाखल केल्या असल्याची माहिती पोनि सत्यजित ताईतवाले यांनी दिली. घटनेचा अधिक तपास पोउ दीपक आवटी हे करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShootingगोळीबारFiringगोळीबारDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी