शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

फतियाबाद बनले ‘टोमॅटो हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2016 12:39 AM

अमीर शेख , दौलताबाद औरंगाबाद नाशिक महामार्गावरील फतियाबाद (ता. गंगापूर) या गावातून दररोज २५ ते ३० मोठे ट्रक भरून टमाटे दिल्ली, गुजरात या राज्यांत जात असल्याने

अमीर शेख , दौलताबादऔरंगाबाद नाशिक महामार्गावरील फतियाबाद (ता. गंगापूर) या गावातून दररोज २५ ते ३० मोठे ट्रक भरून टमाटे दिल्ली, गुजरात या राज्यांत जात असल्याने या परिसराची ‘टोमॅटो हब’ म्हणून ओळख बनली आहे. फतियाबादसह परिसरातील जांभाळा, माळीवाडा, आसेगाव, रामपुरी, केसापुरी, टेकलवाडी, वंजारवाडी, टेकल वाडी, पाच पीरवाडी आदी गावामधील शेतक ऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाट्यांची लागवड केली आहे. यामुळे दिल्ली, गुजरात राज्यातील व्यापारी फतियाबाद येथे येऊन टमाटे खरेदी करतात. गावातच शेतकऱ्यांना रोख पैसे मिळत आहेत. पूर्वी येथील शेतकऱ्यांचा ओढा कपाशी पिकाकडे होता. टमाट्याच्या एका कॅरेटला १८० रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे. सध्या पावसामुळे टमाट्याचा रंग हा तिरंगी होत आहे. तसेच ते नरमही होत आहेत, त्यामुळे भाव कमी मिळत आहे. टमाटे हंगाम हा दोन महिने असतो. टमाट्याची लागवड जून महिन्यात करतात. त्यानंतर दोन महिन्यात फळ लागायला सुरुवात होते. त्यावर तीन ते चार वेळा फवारणी करावी लागते अशी माहिती शेतकरी भारत भास्कर यांनी दिली. फतियाबाद परिसरातील टमाटे हे चांगल्या दर्जाचे असून ते लवकर खराब होत नाहीत, अशी माहिती दिल्ली येथील व्यापारी इंदर कुमार यांनी दिली. टमाट्यामुळे फतियाबादचे नाव देशपातळीवर गेले आहे. टमाट्याच्या उत्पादनामुळे फतियाबाद परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.