सलाम मुंबई फाऊंडेशन व भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महापालिका औरंगाबाद यांच्यातर्फे, महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रभावीपणे ९ निकष ठरवून पोस्टर स्पर्धा, गावकरी, पालक, विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला. मिटमिटा महापालिकेच्या शाळेने हे निकष पूर्ण करून १०० पैकी १०० अंक घेऊन मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून, टाेबॅको फ्री स्कूल म्हणून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आर. सी. हिवाळे, शिक्षक देवरे, पंडित, तडवी, जाधव, सलाम फाऊंडेशनचे समन्वयक संदीप वाहूळ, आदींनी परिश्रम घेतले. महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, शिक्षणाधिकारी थोरे, मिटमिटा शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बनकर, ॲड. अशोक मुळे, शिवाजी गायकवाड, आदींनी शाळेचे कौतुक केले.
तंबाखूमुक्त नियंत्रण सर्व्हेत मिटमिटा शाळा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:04 AM