शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

बर्थ सर्टिफिकेट काढताना पालकांना यातना; मनपा वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्जांचे ढिगारे

By मुजीब देवणीकर | Published: August 19, 2023 12:50 PM

कोणत्या ॲपवरून ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवावे, हे नागरिकांना माहीतच नाही.

छत्रपती संभाजीनगर : जन्म घेतलेल्या प्रत्येक बाळाचे बर्थ सर्टिफिकेट महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातून घ्यावेच लागते. नागरिकांना मनपाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येऊ नये, म्हणून प्रशासनाने ऑनलाइन सोय केल्याची घोषणाही केली. ऑनलाइन प्रमाणपत्रासंदर्भात जनजागृतीच नसल्याने ९९ टक्के पालक वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करीत आहेत. शुक्रवारपर्यंत विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये शेकडोंच्या संख्येने अर्जांचे गठ्ठे पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मृत्यू प्रमाणपत्राची गतही तशीच आहे, हे विशेष.

महिनाभरापूर्वी महापालिकेने विविध १६ सेवा ऑनलाइन केल्याची घोषणा केली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पणही करण्यात आले. नागरिकांना घरबसल्या जन्म- मृत्यू प्रमाणपत्र मिळेल, असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच आहे. कोणत्या ॲपवरून ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवावे, हे नागरिकांना माहीतच नाही. ऑनलाइन प्रमाणपत्र मोजक्याच काही नागरिकांनी काढले, त्यावर बाळाचे नाव नसते. नाव टाकण्यासाठी वॉर्ड कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. शुक्रवारी ‘लोकमत’ने सर्व वॉर्ड कार्यालयांचा आढावा घेतला असता विदारक चित्र काही ठिकाणी निदर्शनास आले. वॉर्ड कार्यालय सहामध्ये एकही अर्ज प्रलंबित नाही; पण अन्य आठ वॉर्ड कार्यालयांमध्ये ‘पेन्डन्सी’ दिसून आली.

काय म्हणतात वॉर्ड अधिकारी?- वॉर्ड क्रमांक पाचमध्ये काही दिवसांपासून संगणक आणि प्रिंटरमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे थकीत अर्जांची संख्या वाढली आहे. एरव्ही दोन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध आहे.-सविता सोनवणे, वॉर्ड अधिकारी

- वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अनेक पालक बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल करून निघून जातात. परत अर्ज घेण्यासाठी येतच नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण जास्त आहे. जेव्हा गरज असेल तेव्हाच प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात.-नईम अन्सारी, वॉर्ड अधिकारी

वॉर्ड क्रमांक सातमध्ये दररोज ५० ते ५५ अर्ज जन्म प्रमाणपत्रासाठी येतात. या भागात रुग्णालयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकाच दिवसात निपटारा शक्य नसतो. दोन ते तीन दिवसांत नागरिकांना प्रमाणपत्र मिळते.-प्रसाद देशपांडे, वॉर्ड अधिकारी

थकीत अर्जांचा तपशीलवॉर्ड- जन्म दाखला- मृत्यू प्रमाणपत्र०१---१२५-------१२०२---२०--------०३०३---५००------०००४---२५-------०८०५---४५------०४०६---००------०००७---३८९-----१५०८---१२------०८०९---३०-------१७

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका