वाळूज महानगर : लग्नाचे आमिष दाखवून १८ वर्षीय युवतीवर लंैगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनयकुमार (रा. उत्तरप्रदेश) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्या अत्याचारामुळे पिडीता पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे तक्रारीत नमूद आहे.औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात राहणाºया पीडित युवतीचे आई-वडील विभक्त झालेले असून, पिडीता आई व दोन लहान भावांसह शहरात वास्तव्यास आहे. गतवर्षी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथे असल्यामुळे युवतीसह आई व लहान भाऊ गतवर्षी १८ एप्रिल रोजी गेले होते. लग्न झाल्यानंतर तरुणीची आई व भाऊ हे दोघे २६ एप्रिल रोजी औरंगाबाद परतले. पीडित युवती आत्याकडे थांबली होती. आत्याकडे ८ दिवस राहिल्यानंतर ती आत्याच्या जावेच्या घरी गेली. तेथेच तिची विनयकुमारशी (२८) ओळख झाली. त्यांचे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
विनयकुमार साजापूर शिवारातील कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. १३ आॅगस्टला ती त्याच्या कंपनीत गेली होती. तेथेच त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सहा ते सात महिने सातत्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातूनच पीडित युवती गर्भवती राहिली. विनयकुमार याने लग्नास टाळाटाळ सुरु केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित युवतीने पोलीस ठाणे गाठले. पीडित युवतीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात विनयकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.