शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

तब्बल १७०० गुन्हेगार औरंगाबाद पोलिसांना सापडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 7:25 PM

सुमारे २० वर्षांपासून वाँटेड गुन्हेगारांची यादी वाढतच आहे

ठळक मुद्देगुन्हेगारांची अर्धवट आणि चुकीच्या नावांची नोंद या यादीनुसार सर्वाधिक फरार आरोपींमध्ये क्रांतीचौक प्रथम क्रमांकावर आहे.

औरंगाबाद : सुमारे वीस वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर वाँटेड आणि फरारी गुन्हेगारांची यादी सतत वाढतच असल्याचे समोर आले. पोलिसांच्या रेकॉर्डवर १ हजार ७२२ वाँटेड गुन्हेगार असून, ते पोलिसांना सापडत नाहीत. या फरारी गुन्हेगारांची यादीच पोलीस आयुक्तांनी त्यांच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) टाक ली आहे. 

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत १७ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. प्रत्येक ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. बऱ्याचदा कारवाईदरम्यान गुन्हेगार पोलिसांना चकमा देतात, तर काही पकडले जातात. अशावेळी आपल्या साथीदारांना वाचविण्यासाठी पळून गेलेल्या गुन्हेगारांची अर्धवट आणि चुकीची नावे आणि पत्ता देतात. परिणामी, पोलिसांच्या दप्तरी गुन्हेगारांच्या यादीत चुकीची आणि अर्धवट नावांची नोंद होते. अर्धवट आणि चुकीचे नाव, पत्ता असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होत नाही. यामुळे मागील वीस ते बावीस वर्षांपासून पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांतर्गत फरारी गुन्हेगारांची यादी वाढतच आहे. या यादीनुसार सर्वाधिक फरार आरोपींमध्ये क्रांतीचौक प्रथम क्रमांकावर आहे. क्रांतीचौक ठाण्यात गुन्हे नोंद झालेले ३२२ आरोपी पोलिसांना सापडत नाहीत, तर दुसऱ्या स्थानी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे आहे. 

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील २२३ गुन्हेगार पोलिसांना वाँटेड आहेत, तर १९९ फरार गुन्हेगारांचे ओझे डोक्यावर असलेले सिडको ठाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुकुंदवाडी १५९, सिटीचौक १७५, जिन्सी ११२, जवाहरनगर ११५,  छावणी १०५,उस्मानपुरा ५५,  सातारा ४३, हर्सूल १६, एमआयडीसी सिडको ९०, वाळूज ५७,  बेगमपुरा ठाणे ३३, दौलताबाद ठाणे ४ आणि वेदांतनगर ठाण्यातील ३ गुन्हेगार पोलिसांना सापडत नाहीत. विशेष म्हणजे गतवर्षीच सीआरपीसी २९९ नुसार ही यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. 

गुन्हेगारांची यादी कमी करण्यासाठी प्रयत्नयाविषयी बोलताना गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध ठाण्यांतर्गत पाहिजे असलेल्या आरोपींच्या गतवर्षीच्या यादीतील सुमारे शंभर गुन्हेगार कमी झाले आहेत. यातील अनेक गुन्हेगार स्वत:हून परस्पर कोर्टात हजर होतात. त्याविषयीची नोंद रेकॉर्डला घेऊन यादीतून त्यांची नावे कमी केली जात आहेत. शिवाय पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून वाँटेड गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद