उपमहापौर निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 07:21 PM2019-12-20T19:21:02+5:302019-12-20T19:24:46+5:30

भाजप अपक्ष आघाडीचे कार्ड वापरणार

tough fight in all political parties in the vice Mayor elections of Aurangabad Municipality | उपमहापौर निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार

उपमहापौर निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेची अग्निपरीक्षा

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा आज मंजूर झाला. त्यानंतर लगेच महापालिका प्रशासनाने उपमहापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची कारवाई सुरू केली. आठ ते दहा दिवसांमध्ये उपमहापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. या निवडणुकीत शिवसेनेला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागणार आहे. अर्ध्या सत्तेतून बाहेर पडलेला भाजप अपक्ष आघाडीला पुढे करून नवीन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आघाडीला एमआयएमने पाठिंबा दिल्यास भाजपचे पारडे ऐनवेळी जड होऊ शकते.

महापालिका निवडणुकीसाठी चारच महिने शिल्लक आहेत. एप्रिल २०२० मध्ये निवडणुका घेण्यात येतील. त्यापूर्वी ४५ दिवस अगोदर आचारसंहिता लागेल. अडीच महिन्यांसाठी महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी लागत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज विजय औताडे यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर प्रशासनाने लगेच विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची कारवाई सुरू केली. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये निवडणूक घेण्याचा कार्यक्रम निश्चित होईल. महापालिकेच्या इतिहासात असा प्रसंग यापूर्वी कधीच आला नाही. राज्यातील राजकीय समीकरणे बदलताच महापालिकेतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपने पूर्णपणे महापालिकेतील सत्ता सोडलेली नाही. वॉर्ड सभापती, स्थायी समिती सभापती ही महत्त्वाची पदे आजही भाजपच्या ताब्यात आहेत.

काँग्रेस देणार उमेदवारी
राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले आहे. आता मनपाच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागेल. बहुमताचा आकडा ५६ राहणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी आणि अपक्षांना सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे.

भाजपची राजकीय खेळी
उपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवारी देईल, अशी शक्यता कमीच आहे. भाजपसोबत असलेल्या अपक्ष आघाडीकडून एक उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. भाजप, अपक्ष आघाडी एमआयएमचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करील. हा प्रयोग यशस्वी झाला, तर सेनेची डोकेदु:खी वाढणार, हे निश्चित.

भाजप आपला उमेदवार देईल
निवडणूक लागेल किंवा नाही याची शाश्वती नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास भाजप आपला उमेदवार देईल. सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत उमेदवार निवडून आणून दाखवावे.
-किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप,

पक्षीय बलाबल
शिवसेना-     २९
भाजप-     २४
एमआयएम-    २४
काँग्रेस-     ११
बीएसपी-     ०५
राष्ट्रवादी काँग्रेस- ०४
रिपाइं (डेमोक्रॅटिक)-     ०२
अपक्ष-     १७
एकूण     ११५


विभागीय आयुक्तांकडे नोंदणीनुसार
४० राष्ट्रीय लोकशाही आघाडी (शिवसेना)
२६ एमआयएम आघाडी
२२ भारतीय जनता पार्टी
१३ शहर विकास आघाडी (भाजपप्रणीत)
११ काँग्रेस आघाडी
गटात नोंदणी न केलेले सदस्य- सचिन खैरे, अप्पासाहेब हिवाळे, अफसर खान

Web Title: tough fight in all political parties in the vice Mayor elections of Aurangabad Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.