शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

उपमहापौर निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 7:21 PM

भाजप अपक्ष आघाडीचे कार्ड वापरणार

ठळक मुद्देशिवसेनेची अग्निपरीक्षा

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा आज मंजूर झाला. त्यानंतर लगेच महापालिका प्रशासनाने उपमहापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची कारवाई सुरू केली. आठ ते दहा दिवसांमध्ये उपमहापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. या निवडणुकीत शिवसेनेला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागणार आहे. अर्ध्या सत्तेतून बाहेर पडलेला भाजप अपक्ष आघाडीला पुढे करून नवीन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आघाडीला एमआयएमने पाठिंबा दिल्यास भाजपचे पारडे ऐनवेळी जड होऊ शकते.

महापालिका निवडणुकीसाठी चारच महिने शिल्लक आहेत. एप्रिल २०२० मध्ये निवडणुका घेण्यात येतील. त्यापूर्वी ४५ दिवस अगोदर आचारसंहिता लागेल. अडीच महिन्यांसाठी महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी लागत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज विजय औताडे यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर प्रशासनाने लगेच विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्याची कारवाई सुरू केली. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये निवडणूक घेण्याचा कार्यक्रम निश्चित होईल. महापालिकेच्या इतिहासात असा प्रसंग यापूर्वी कधीच आला नाही. राज्यातील राजकीय समीकरणे बदलताच महापालिकेतही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपने पूर्णपणे महापालिकेतील सत्ता सोडलेली नाही. वॉर्ड सभापती, स्थायी समिती सभापती ही महत्त्वाची पदे आजही भाजपच्या ताब्यात आहेत.

काँग्रेस देणार उमेदवारीराज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले आहे. आता मनपाच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागेल. बहुमताचा आकडा ५६ राहणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी आणि अपक्षांना सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे.

भाजपची राजकीय खेळीउपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवारी देईल, अशी शक्यता कमीच आहे. भाजपसोबत असलेल्या अपक्ष आघाडीकडून एक उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. भाजप, अपक्ष आघाडी एमआयएमचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करील. हा प्रयोग यशस्वी झाला, तर सेनेची डोकेदु:खी वाढणार, हे निश्चित.

भाजप आपला उमेदवार देईलनिवडणूक लागेल किंवा नाही याची शाश्वती नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास भाजप आपला उमेदवार देईल. सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत उमेदवार निवडून आणून दाखवावे.-किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप,

पक्षीय बलाबलशिवसेना-     २९भाजप-     २४एमआयएम-    २४काँग्रेस-     ११बीएसपी-     ०५राष्ट्रवादी काँग्रेस- ०४रिपाइं (डेमोक्रॅटिक)-     ०२अपक्ष-     १७एकूण     ११५

विभागीय आयुक्तांकडे नोंदणीनुसार४० राष्ट्रीय लोकशाही आघाडी (शिवसेना)२६ एमआयएम आघाडी२२ भारतीय जनता पार्टी१३ शहर विकास आघाडी (भाजपप्रणीत)११ काँग्रेस आघाडीगटात नोंदणी न केलेले सदस्य- सचिन खैरे, अप्पासाहेब हिवाळे, अफसर खान

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस