शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

सिल्लोडमध्ये सत्तार-सुरेश बनकर यांच्यात थेट लढत; सत्तारांच्या भाजपासोबत वादाने चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 5:05 PM

महाविकास आघाडीत जाऊन तिसऱ्यांदा विधानसभा लढविणाऱ्या बनकर यांना भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३५ पैकी ११ उमेदवारांनी माघार घेतली. आता एकूण २४ उमेदवार रिंगणात असून, खरी लढत महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यातच होणार आहे.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात १९९५, १९९९ व २००४ असे सलग तीन वेळा विजय मिळविणाऱ्या भाजपाला २००९ व २०१४ मध्ये भाजपाच्या सुरेश बनकर यांना विजय मिळवून देता आला नाही. २०१९ मध्ये युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने यावेळी सेनेकडून लढून अब्दुल सत्तार यांनी विजयाची हॅट् ट्रिक केली. आता चौथ्यांदा विजय मिळविण्यासाठी सत्तार यांनी कंबर कसली आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा भाजपाचा सोडून उद्धवसेनेत आलेले महाविकास आघाडीचे सुरेश बनकर हे उमेदवार आहेत. तिसऱ्यांदा विधानसभा लढविणाऱ्या बनकर यांना भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजपाचे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून सत्तार आणि भाजपा नेत्यांमधील वाद पराकोटीला गेला आहे. अशात मनोज जरांगे-पाटील यांनी या उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने बनकर यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सत्तार मुरब्बी राजकारणीमहायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते त्यांच्या विरोधात असले तरी हा विरोध गृहीत धरून त्यांनी वेगळी रणनीती आखल्याची चर्चा आहे. तगडा जनसंपर्क, मतदारसंघात केलेली विकासकामे आणि शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी केलेला प्रचार मतांमध्ये परावर्तीत करण्यात त्यांना कितपत यश मिळेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक रिंगणातील उमेदवार१) अब्दुल सत्तार अब्दुल नबी (महायुती ), २) सुरेश पांडुरंग बनकर (महाविकास आघाडी), ३) संगपाल चिंतामण सोनवणे (बहुजन समाज पार्टी), ४) बनेखा नूरखा पठाण (वंचित बहुजन आघाडी), ५) राजू अफसर तडवी (भारतीय ट्रायबल पार्टी), ६) ॲड. शेख उस्मान शेख ताहेर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), अपक्ष उमेदवार : ७) अनिल मदन राठोड, ८) अफसर अकबर तडवी, ९) अरुण चिंतामण चव्हाण, १०) अशोक विठलं सोनवणे, ११) दादाराव श्रीराम आळणे, १२) राजू अशोक गवळी, १३) परिक्षित माधवराव भरगाडे, १४) सुरेश पांडुरंग बनकर, १५) भास्कर शंकर सरोदे, १६) रफिक मनव्वरखान पठाण, १७) राजू पांडुरंग साठे, १८) राहुल अंकुश राठोड, १९) विकास भानुदास नरवडे, २०) शरद अन्ना तिगोटे, २१) शेख मुख्तार शेख सादिक, २२) श्रावण नारायण शिनकर, २३) सचिन दादाराव हावळे, २४) संदीप एकनाथ सुरडकर.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोडAbdul Sattarअब्दुल सत्तार